Tanhaji Movie:तानाजी नसून 'तान्हाजी' मालुसरे हेच खरं नाव सांगणाऱ्या त्यांच्या वंशज शीतल मालुसरे; पाहा ऐतिहासिक संदर्भांविषयी काय म्हणाल्या त्या...
Ajay Devgn in Tanhaji The Unsung Warrior (Photo Credits: Twitter)

Exclusive: The Unsung Warrior या ऐतिहासिक ऍक्शनपटाचा ट्रेलर 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. परंतु, सिनेमाच्या नाव तानाजी ऐवजी तान्हाजी का? असा सवाल अनेकांना पडला आहे. शाळेतील इतिहासात 'गाद आला पण सिंह गेला...' ही ओळ इतिहासाच्या पुस्तक वाचली असताना त्यात तानाजी मालुसरे असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु, या चित्रपटात मात्र 'तान्हाजी' असं नाव वापरलं असल्याने ते चुकीचं तर नाही ना असा अनेकांचा समाज झाला आहे. हाच समाज दूर करण्यासाठी तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज यांनी LatestLY मराठी ला दिलेल्या मुलाखतीत यामागची खरी कहाणी सांगितली आहे.

शीतल या स्वतः एका ऐतिहासिक पुस्तकाच्या लेखिका आहेत.तान्हाजी यांच्या नावाचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या, "तानाजी यांचं खरं नाव 'तान्हाजी' असंच होतं. त्याचे ऐतिहासिक पुरावे देखील मिळाले आहेत. त्यामुळेच चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी माझ्याच सांगण्यावरून चित्रपटाचे नावात 'तान्हाजी' या शब्दाचा वापर केला आहे."

शीतल पुढे म्हणाल्या, "चित्रपटाच्या कथेसाठी जेष्ठ इतिहास संशोधक लेखक दत्ताजी नलावडे यांच्या लिखाणाचा संदर्भ घेण्यात आला आहे. त्यांनी मूळ दसतात नरवीरांचे नाव तान्हाजी असल्याची माहिती दिली होती. अनेक लोककला आणि बखर तसेच मोडीलिपीतलं कागदपत्रातही त्यांच्या नावाचा 'तान्हाजी' असाच उल्लेख करण्यात आला आहे."

Exclusive: Tanhaji चित्रपटात Ajay Devgan यांच्या लुक मधील बारकावे सांगणाऱ्या आहेत तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज; पाहा काय म्हणाल्या शीतल मालुसरे

पाहा Tanhaji: The Unsung Warrior या चित्रपटाचा ट्रेलर,

शीतल यांनी दिलेल्या माहितीवरून चित्रपटाच्या नावामागचा खरा इतिहास स्पष्ट होतो. त्याचसोबत त्यांनी अजय देवगण यांच्या लुकमधील बारकावे देखील ओम राऊत यांना सांगितले होते. त्यावरूनच चित्रपटातील तान्हाजीचा लुक फायनल करण्यात आला आहे.