Exclusive: Tanhaji चित्रपटात Ajay Devgan यांच्या लुक मधील बारकावे सांगणाऱ्या आहेत तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज; पाहा काय म्हणाल्या शीतल मालुसरे
Tanhaji poster, Shital Malusare (Photo Credits: Facebook)

Tanhaji या नव्या बॉलीवूड ऍक्शनपटाचा कालच ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. या ट्रेलरमधून चित्रपटाची भव्यदिव्यता लक्षात येतेच पण तितकेच या ट्रेलरने तान्हाजी मालुसरे यांच्याविषयी कुतूहल देखील वाढवले आहे.

ट्रेलरमधून तान्हाजी मालुसरे यांचे शौर्य तर दिसतेच पण त्याहून जास्त डोळ्यात भरतो तो त्यांचा रांगडा लुक. अजय देवगण यांनी साकारलेल्या पराक्रमी अशा तान्हाजी मालुसरे (Ajay Devgan's look in Tanhaji movie) यांच्या लुकचे बारकावे सांगितले आहेत मालुसरेंच्या बाराव्या वंशज शीतल मालुसरे यांनी.

महाड तालुक्यात राहणाऱ्या शीतल मालुसरे यांनीच दिग्दर्शक ओम राऊत यांना तान्हाजी यांच्या दिसण्यातील आणि वागण्यातील बारकावे सांगितले आहेत. LatestLY मराठी ला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत शीतल म्हणाल्या, "तान्हाजी मालुसरे यांचा पात्र अजय देवगण यांनी अगदी योग्यरीत्या साकारलं आहे. परंतु त्यांचा लुक तान्हाजींसारखा होणं अत्यंत महत्त्वाचं होतं. मग त्यांच्या मिशा असोत किंवा त्यांच्यातील रांगडेपणा. आम्ही ओम राऊत यांना त्याबद्दल माहिती दिली आणि त्यांनी अगदी तसेच तान्हाजी अजय देवगण यांच्या रूपात मोठ्या पडद्यावर साकारले आहेत."

तान्हाजीच्या मिशांबद्दल बोलताना शीतल म्हणाल्या, "त्यांच्या मिशांचा पीळ इतका मोठा असायचा की जवळपास एका लिंबूचं वजन त्या पेलू शकायच्या."

काजोल यांनी साकारलेल्या सावित्रीबाई मालुसरे यांच्या लुक विषयी सांगताना त्या म्हणाल्या, "काजोल यांचा लुक चित्रपटात कसा असणार आहे ते ओम राऊत यांनी आम्हाला दाखवलं होतं. तो लुक इतका परफेक्ट होता की आम्ही लगेचच त्याला होकार दिला."