Fatima Sana Shaikh: वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला; बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख हिचे वक्तव्य
Fatima Sana Shaikh (Photo Credit: Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने सुरु केलेल्या मीटू मोहीम अंतर्गत अनेक अभिनेत्री, मॉडल यांनी आपबीती सांगत लैंगित गैरवर्तनाचे आरोप केले होते. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी मीटू मोहीम अंतर्गत आपला अनुभव सांगितला होता. यातच ‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दंगल गर्ल फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक खुलासा केला. तिच्या वक्तव्याने सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. तसेच प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरे जात असतो. प्रत्येक स्त्री, प्रत्येक अल्पसंख्याक दररोज संघर्ष करतोय, असेही ती म्हणाली आहे.

दरम्यान, फतिमा म्हणाली की, तुला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी अनेक संघर्ष करावा लागतील. तसेच फक्त सेक्सच्या बदल्यातच तुला मिळेल, असे अनेकजण म्हणाले होते. मी अनेकदा माझी नोकरी गमावली आहे. केवळ बॉलिवूड नव्हेतर प्रत्येक क्षेत्रात महिलांना बऱ्याच अडचणींना समोरे जाव लागते. मी जेव्हा तीन वर्षांची होते, तेव्हा माझा विनयभंग झाला होता. त्यामुळे ही समस्या ती खोलवर आहे. हे तुम्ही समजू शकतात, असे फातिमा म्हणाली आहे. तसेच तू कधीच अभिनेत्री बनू शकत नाहीस. तू दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय यांसारखी दिसत नाही. मग तू अभिनेत्री कशी होणार? असे प्रश्न मला विचारले जात होते, असेही ती म्हणाली आहे. हे देखील वाचा- 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका अल्पावधीतच वादाच्या भोवऱ्यात; कथानकावर आक्षेप घेत पुजारी, ग्रामस्थांची मालिका बंद करण्याची मागणी

अभिनेत्री फातिमा सना शेख बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. बऱ्याच चित्रपटांत ती बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली आहे. गेल्या दोन दशकांपासून ती या इंडस्ट्रीचा भाग आहे. ‘इश्क’, ‘चाची 420’, ‘वन टू का फोर’ आणि ‘बडे दिलवाला’ या चित्रपटांमध्ये ती बाल कलाकार म्हणून दिसली होती. फातिमा सना शेख लवकरच ‘लुडो’ आणि ‘सूरज पे मंगल भारी’सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.