अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Photo Credits-Twitter)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश पुढील दिवस कायम राहणार आहेत. तर लॉकडाउन जवळजवळ 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ कायम असल्यामुळे घरात नागरिक अडकून पडले आहेत. परंतु सारख घरात बसून बसून कंटाळा येत असल्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या परिवारासोबत वेळ मिळतो आहेच. पण काही जण लॉकडाउनच्या काळात आपले छंद सुद्धा जोपासताना दिसून येत आहे. या बाबत बोलायचे झाल्यास लॉकडाउनमुळे शुटिंग रद्द करण्यात आल्याने कलाकार मंडळी सुद्धा आपल्या आवडत्या गोष्टी घरी करताना दिसून येत आहेत. यातच आता कोरोनामुळे घरात अडकलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिची चित्रकारिता पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. कारण सोनाक्षी हिने तिने काढलेल्या एका चित्रांचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.

सोनाली हिने सध्या शांततेचे प्रतीक असणारे गौतम बुद्ध यांच्या चेहऱ्याची सुंदर अशी प्रतिमा रेखाटल्याचे दिसून येत आहे. हे चित्र काढतानाचा तिने व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला असून त्याला तिची चित्रकारिता किती अप्रतिम आहे हे दिसतेय. सोनाली हिने ट्वीटरवर चित्र काढण्याचा व्हिडिओ पोस्ट करत असे म्हटले आहे की, मला चेहरे काढण्याची फार आवड आहे. त्यामुळे मी सर्वात शांत अशा चेहऱ्याचे रेखाटन केले आहे. सोनाक्षी तिचे हे पेन्टिंग्स विकून त्यामधून मिळेल तेवढे पैसे दररोज वेतन मिळाऱ्यांसाठी दिले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चित्र विकत घ्यायचे असल्यास त्यासाठी बोली लावा असे आवाहन ही सोनाक्षी हिने केले आहे.(लॉक डाऊनमुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत चित्रपट; INOX, PVR ने व्यक्त केली नाराजी, निर्मात्यांना काही काळ थांबण्याची विनंती)

यापूर्वी सुद्धा सोनाक्षी हिने मुक्तपणाचे उदाहरण देणारे एक चित्र रेखाटले होते. त्याला सोनाक्षी हिने How I created wings of freedom! असे कॅप्शन दिले होते.

तर लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांसाठी सोनाक्षी हिने मदतीचा हात पुढे केला आहे. सोनाक्षी हिने FANKIND यांच्यासोबत मिळून डेली वेजेस वर्कर्ससाठी रेशन किट उपलब्ध करुन देण्यासाठी तिने काढलेल्या पेन्टिंग्स लिलावासाठी काढल्या आहेत. सोनाक्षी हिने तिच्या सर्व पेन्टिंग्स एका वर्षात पूर्ण केल्या असल्याचे ही म्हटले आहे. पेंन्टिंग्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून ती आता गरजूंना मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे.