Jacqueline Fernandez (PC - Instagram)

Money Laundering Case: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही ठग सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली. न्यायालयाकडून अभिनेत्रीला मोठा दिलासा मिळाला आहे. आता ती 25 ते 27 मे या कालावधीत अबुधाबी आणि 28 मे ते 12 जूनपर्यंत इटलीला भेट देऊ शकणार आहे.

सुकेश चंद्रशेखर व्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्रात आरोपी म्हणून नाव दिले आहे. या प्रकरणी यापूर्वी ईडीने जॅकलिनची अनेकदा चौकशी केली आहे. सुकेश चंद्रशेखरवर तुरुंगात असताना व्यावसायिकाच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. जॅकलीन फर्नांडिसलाही या पैशाचा फायदा झाल्याचे भक्कम पुरावे एजन्सीकडे आहेत. (हेही वाचा - Gyaarah Gyaarah Teaser: 'ग्यारह ग्यारह' चा टीझर रिलीज, गुनीत मोंगा आणि करण जोहर पहिल्यांदाच सीरीजसाठी एकत्र, Watch Video)

सुकेश चंद्रशेखर यांनी जॅकलिन फर्नांडिसला दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तूही ईडीने जप्त केल्या आहेत. सुकेश तुरुंगात असतानाही जॅकलीनला भेटल्याचे म्हटलं जातं आहे. सध्या आरोपी सुकेश तुरुंगात असून अनेकदा अभिनेत्रीची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.