Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड क्युट कपल्समधील एक जोडपं म्हणजे अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli). अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार ही बातमी वा-यासारखी पसरली. या बातमीने बॉलिवूडसह क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी या दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला. अनुष्काने पहिल्यांदा आपले बेबी बम्प दाखवून आपल्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. त्यानंतर आज तिने पुन्हा आपल्या बेबी बंपसह (Baby Bump) एक सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

या फोटोमध्ये अनुष्का शर्मा समुद्रकिनारी वा-याचा छान आनंद घेत बेबी बंप दाखत आहे. हा फोटो खूपच व्हायरल होत असून यात ती खूपच गोड दिसत आहे. Anushka Sharma-Virat Kohli Announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या 'गुड न्यूज' नंतर युजवेंद्र चहल, क्रिस गेलसह खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव

 

View this post on Instagram

 

Nothing is more real & humbling than experiencing creation of life in you . When this is not in your control then really what is ?

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

या फोटोवरून अनुष्का आपली प्रेगन्सी छान एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोत आपल्या बेबी बंपकडे ती तितक्याच कुतूहलाने आणि आनंदाने पाहात आहे. या फोटोला 31 लाखाहूं अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोला करीना कपूरसह मौनी रॉय, डायना पेंटी, दिया मिर्झा यांसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिचे अभिनंदन केले आहे.

यापूर्वीही बर्‍याचदा अनुष्का प्रेग्नन्ट असल्याची अफवा पसरली होती, पण तिने त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींपेक्षा अनुष्काला लवकर लग्न करण्याविषयीही अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. दुसरीकडे वर्क फ्रंटवर, अनुष्काने लॉकडाऊन दरम्यान 'पाताललोक' आणि 'बुलबुल' सारख्या आश्चर्यकारक वेब शोद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. निर्माता म्हणून अनुष्काच्या निवडीबद्दल चाहत्यांनी देखील कौतुक केले. अनुष्का अखेर 'झिरो' चित्रपटात झळकली होती जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.