
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी गुरुवारी चाहत्यांसोबत घरी नव्या पाहुणा येण्याची 'गुड न्यूज' शेअर केली. दोघं 'पॉवर-कपल' ने सोशल मीडियावरून माहिती दिली. विराट-अनुष्काने ट्विटर, इंस्टाग्रामवर दोघांचा सुंदर असा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अनुष्काचा 'बेबी बंप' (Anushka Sharma Baby-Bump) दिसत आहे. "आम्ही दोनचे तीन झालोय!" असे कॅप्शन देत विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करून आनंदाची बातमी शेअर केली. विराट-अनुष्काच्या या 'गुड न्यूज' सोशल मीडियावर बॉलीवूडपासून क्रिकेट विश्वातून या पॉवर-कपलसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, विराट सध्या इंडियन प्रीमिअर लीगसाठी (आयपीएल) युएई येथे आहे, तर अनुष्का मुंबईच्या आपल्या राहत्या घरी आहे. (Virat Kohli-Anushka Sharma announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली 'गुड-न्यूज')
“आता आम्ही तिघे होणार. जानेवारी 2021,” असे विराटने आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे. अशीच पोस्ट अनुष्कानेही केली. 10 डिसेंबर 2017 रोजी टीम इंडिया कर्णधाराने बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केलं. त्यानंतर सोशल मीडियावर विराटला सतत बाबा कधी होणार हा प्रश्न विचारला जात होता आणि आज अखेर विराटनेच याची घोषणा आज केली.
खेळाडूंकडून विराट-अनुष्काला शुभेच्छा





यापूर्वीही बर्याचदा अनुष्का प्रेग्नन्ट असल्याची अफवा पसरली होती, पण तिने त्या सर्व अफवा फेटाळून लावल्या. बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींपेक्षा अनुष्काला लवकर लग्न करण्याविषयीही अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. दुसरीकडे वर्क फ्रंटवर, अनुष्काने लॉकडाऊन दरम्यान 'पाताललोक' आणि 'बुलबुल' सारख्या आश्चर्यकारक वेब शोद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. निर्माता म्हणून अनुष्काच्या निवडीबद्दल चाहत्यांनी देखील कौतुक केले. अनुष्का अखेर 'झिरो' चित्रपटात झळकली होती जो 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.