Amitabh Bachchan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये (Nanavati Hospital) उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. दरम्यान हॉस्पिटलमधूनही बिग बी (Big B) आपल्या चाहत्यांशी सोशल मीडिया पोस्टद्वारे कनेक्टेड राहत आहेत. आता नव्या ट्विटमध्ये बिग बी यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजात त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षाव होऊ लागला. या सर्वांचे बिग बी यांनी खास संदेश लिहीत आभार मानले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांना धन्यवाद देताना ट्विटमध्ये लिहिले, "मला तुमच्या सर्वांकडून खूप प्रेम, आशीर्वाद आणि प्रार्थना यांनी भरलेले मेसेज, एसएमएस, व्हॉट्सअॅप, इंस्टा, ब्लॉग पोस्ट आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून मिळाले. माझ्या कृतज्ञतेला सीमा राहिलेली नाही. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलमुळे मी फार काही बोलू शकत नाही. प्रेम." (कोरोना व्हायरसशी झुंज देणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी खास ट्विट करत केला डॉक्टरांना सलाम, View Tweet)

Amitabh Bachchan Tweet:

काल अमिताभ बच्चन यांनी विठ्ठल रखुमाईचा फोटो शेअर केला होता. यापूर्वी बिग बी यांनी डॉक्टरांना सलाम करणारी कविता पोस्टद्वारे सादर केली होती. दरम्यान अमिताभ यांच्या सह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झली आहे. परंतु, सर्वांमध्येच याची हलकी लक्षणे असल्याने त्यांची प्रकृती लवकरच सुधारेल अशी आशा आहे.