
महानायक अमिताभ बच्चनसह (Amitabh Bachchan) त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली. सध्या अमिताभ यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) उपचार सुरू आहेत. अमिताभ सध्या कोरोना विरोधात झुंज देत असले तरी ते सोशल मीडियावरदेखील तेवढेचं अॅक्टिव्ह आहेत.
अमिताभ यांनी रुग्णालयातून आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विठ्ठल रुक्मिणीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करताना 'ईश्वराच्या चरणी समर्पित,' असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - सारा अली खान ने शेअर केला तिच्या आयुष्यातील खऱ्या 'मिकी माऊस'चा फोटो; Watch Photo)
बिग बींनी शेअर केलेल्या फोटोवरून त्यांची देवावर आस्था असल्याचं दिसून येत आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीकडे एक प्रकारचं साकडं घातलं आहे. अमिताभ यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर बच्चन कुटुंबियांच्या प्रकृतीसाठी देश तसेच विदेशातील चाहत्यांनी प्रार्थना केली होती.
दरम्यान, बच्चन कुटुंबातील चौघांना करोना विषाणूची लागण झाल्याने मुंबई महापालिकेने त्यांचे ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे चारही बंगले कन्टेंन्मेट झोन म्हणून घोषीत केले होते. बच्चन कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून कोरोना चाचणी करण्यात आली होती.