सारा अली खान ने शेअर केला तिच्या आयुष्यातील खऱ्या 'मिकी माऊस'चा फोटो; Watch Photo
Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या बालपणाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सारा आपले वडिल सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) असल्याचं दिसत आहे. सारा आणि सैफचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

साराने या फोटोला सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोत सारा खूपचं क्युट दिसत आहे. साराच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोला लाईक्स तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. यात बाप-लेकीचं प्रेम स्पष्ट दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना साराने ‘एक असा व्यक्ती जो प्रेमाचे प्रतिक आहे, माझ्या आयुष्यातील खरा मिकी माऊस आहे,’ असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - कैटरीना कैफ हिच्या वाढदिवसानिमित्त सलमान खान ने 'टायगर जिंदा है' चित्रपटातील रोमँटिक फोटो शेअर करुन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा ट्विट)

सारा ही सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. साराने सुशांत सिंह राजपुतसोबत केदारनाथ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर साराने अनेक सुपरहिट चित्रपटात दमदार भूमिका केली. साराने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.