कैटरीना कैफ हिच्या वाढदिवसानिमित्त सलमान खान ने 'टायगर जिंदा है' चित्रपटातील रोमँटिक फोटो शेअर करुन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा ट्विट
Katrina Kaif And Salman Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री कैटरीना कैफ (Katrina Kaif) हिच्या वाढदिवसानिमित्त आज जगभरातून तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कैटरीना आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचबरोबर तिचे चाहते तसेच अनेक बॉलिवूड कलाकार तिला सोशल मिडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यात तिचा फॅन असलेला दबंग सलमान खानने (Salman Khan) देखील तिला हटके स्टाईलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सोशल अकाउंटवर त्याने दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमान खानने आपली लेडी लक कैटरीन कैफ हिच्या सोबत 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील दिल दिया गल्ला या गाण्यातील एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे आणि त्या खाली 'हैप्पी बर्थडे कैटरीना' असे लिहिले आहे. Katrina Kaif Birthday Special: फिटनेस फ्रिक कतरिना कैफ हिचे खास वर्कआऊट व्हिडिओज! (Watch Videos)

 

View this post on Instagram

 

Happy bday Katrina . . @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या फोटोतून या दोघांमधील केमिस्टी दिसून येत आहे ज्याला चाहते प्रचंड पसंत करत आहे. सलमानसह सलमानच्या कुटूंबाने देखील कैटरीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानची बहिण अलवीरा ने कैटसोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कैटरीना कैफ च्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती लवकरच रोहित शेट्टी च्या 'सूर्यवंशी' चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत खिलाडी अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.