Katrina Kaif Birthday Special: फिटनेस फ्रिक कतरिना कैफ हिचे खास वर्कआऊट व्हिडिओज! (Watch Videos)
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ हिचा आज 37 वा वाढदिवस आहे. गेल्या 17 वर्षांपासून काम करत असलेल्या कतरिना कैफ बॉलिवूडमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त पाहुया तिचे काही फिटनेस व्हिडिओज...
Happy Birthday Katrina Kaif: बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ हिचा आज 37 वा वाढदिवस आहे. गेल्या 17 वर्षांपासून काम करत असलेल्या कतरिना कैफ हिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले आहे. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बूम' (Boom) सिनेमाद्वारे कतरिनाने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. त्यानंतर 2005 मध्ये आलेल्या 'मैंने प्यार क्यों किया' (Maine Pyaar Kyun Kiya) या सिनेमातून कतरिना कैफ हिला खरी ओळख मिळाली. सुरुवातीला हिंदी भाषेचा अडथळा असला तरी देखील तिला सिनेमे मिळत गेले आणि तिने देखील मेहनत घेऊन हिंदी भाषेवर काम केले.
आपल्या 17 वर्षांच्या करिअरमध्ये कतरिनाने सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. कतरिनाची अदा आणि डान्स अनेकांना घायाळ करतात. त्यामुळे तिचा प्रचंड मोठा चाहता वर्गही निर्माण झाला. तसंच तिचा फिटनेसही अनेकांना भावतो. कतरिना कैफ हिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा फिटनेस फंडा. पहा तिचे काही वर्कआऊट व्हिडिओज...
पहा व्हिडिओज:
कतरिना कैफ सोशल मीडियावरही भलतीच अॅक्टीव्ह आहे. विविध पोस्ट, व्हिडिओद्वारे ती चाहत्यांना खूश करत असते. कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात तिचा भांडी घासण्याचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. कतरिना यापुढे अनेक वर्ष चाहत्यांचे असेच मनोरंजन करत राहो. याच तिला वाढदिवसानिमित्त लेटेस्टली मराठी कडून शुभेच्छा!
(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2020 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

