कोरोना व्हायरसशी झुंज देणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी खास ट्विट करत केला डॉक्टरांना सलाम (View Tweet)
Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर देशाभरातून बिग बी (Big B) यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना होऊ लागली. पूजा पाठ, होम करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता बिग बी यांची प्रकृती सुधारली असून त्यांच्या शरीरातील कफाचे प्रमाण कमी झाले आहे आणि ऑक्सिजनची पातळही सुधारली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना आणि चाहत्यांच्या प्रार्थनेला यश आले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दरम्यान प्रकृती सुधारल्यामुळे अमिताभ बच्चन हॉस्पिटलमधूनही सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहेत. ट्विट करुन आणि ब्लॉगवर पोस्ट लिहून ते आपल्या चाहत्यांसह कनेक्टेड राहिले आहेत. (कोरोना बाधित अमिताभ बच्चन करत आहेत नानावटी हॉस्पिटलचा खोटा प्रचार? काय आहे व्हायरल पोस्ट मागील सत्य? जाणून घ्या)

अलिकडेच अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांना सलाम करणारे ट्विट केले आहे. बिग बी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "सफेद पोशाख, सेवेसाठी समर्पित, देवाचा अवतार, पीडितांचे साथीदार, त्यांनी आपला अहंकार नष्ट केला आहे, सतत आपली काळजी घेतली, ते दिव्य आहेत. त्यांनी मानवतेचा झेंडा फडकवला आहे." अशा अनोख्या शैलीत बिग बी यांनी डॉक्टरांचे महत्त्व, त्याग, श्रेष्ठत्व अधोरेखित केले आहे.

Amitabh Bachchan Tweet:

आपल्या कवितेतून बिग बी यांनी डॉक्टरांचे अगदी सुरेख वर्णन केले आहे. तसंच कोरोना व्हायरसच्य कठीण काळात जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या डॉक्टरांना सलाम केले आहे.

अमिताभ सह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोना व्हायरसची लागम झाली आहे. त्यामुळे अमिताभ आणि अभिषेक यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ऐश्वर्या आणि आराध्या होम क्वारंटाईन आहेत.