Amitabh Bachchan (Photo Credits: IANS)

बॉलिवूड चे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच अमिताभ बच्चन हे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी लोक प्रार्थना करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियाद्वारे हॉस्पिटलवर काही आरोप लावण्यात येत आहेत. यावर हॉस्पिलटद्वारे एक निवेदन सादर करण्यात आले असून त्यात हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. (कोरोनाच्या लढाईत अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीत होतोय सुधार; नानावटी रुग्णलयातून समोर आली 'ही' माहिती)

व्हायरल पोस्ट:

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती ठीक असूनही त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल लोकांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून त्यांच्याकडून अवाजवी बिल वसूल करतं. बिग बी आणि अभिषेक यांना कोरोनाची कोणतेही लक्षणं नाहीत. तसंच त्यांच्याकडे 4 बंगले आहेत. इतर सुविधा आहेत. त्यामुळे ते घरातच क्वारंटाईन होऊ शकतात. विशेष म्हणजे बिग बी यांच्या बंगल्यात मिनी आयसीयू आहे. ज्यात डॉक्टर्सची टीम त्यांच्या आरोग्याची तपासणी करत असतात. दरम्यान बिग बी यांनी रेडियंट ग्रुपमध्ये गुंतवणूक केली असून त्यांच्या मुख्य सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे ते नानावटी रुग्णालयाचा खोटा प्रचार ते करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दावांनंतर रेडिएंट लाईफ केअर प्राइवेट लिमिटेड (Radiant Life Care Pvt. Ltd) यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

सत्य:

अमिताभ बच्चन हे रेडियंट ग्रुपचे सदस्य नसल्याचे कंपनीने दैनिक भास्करला दिलेल्या पत्रात कंपनीने म्हटले आहे. रेडियंट लाईफ केअरच्या अधिकृत वेबसाईटवर 6 डिरेक्टर्सची नावे देण्यात आली आहेत. ही नावे संजय ओमप्रकाश नायर, महेंद्र लोधा, नारायण शेषाद्री, अभय सोई, प्रशांत कुमार आणि प्राची सिंह अशी आहेत. त्यात अमिताभ बच्चन यांचे नाव नाही.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात कोरोना व्हायरसची हलकी लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत. असे हॉस्पिटलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच 65 वर्षांवरील व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक असल्याचे यापूर्वीच अनेक हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान बिग बी यांनी नानावटी हॉस्पिटलच्या स्टाफचे कौतुक करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. या संदर्भात हॉस्पिटलने 12 जुलै रोजी स्टेटमेंट जारी करत सांगितले की, हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर बिग बी यांनी कोणताही व्हिडिओ शेअर केलेला नाही.