Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगन (Ajay Devgn) मेडे (MayDay) या सिनेमात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनांत खूप उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शन खुद्द अजय देवगन करत आहे. या सिनेमाचे शूटिंग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरु झाले होते. मात्र अमिताभ बच्चन यांचा आज शूटिंगचा पहिला दिवस आहे. याची माहिती अमिताभ बच्चन यांनी सेटवरुन खास फोटो ट्विट करत दिली आहे. सेटवरील पहिल्या फोटोत बिग बींचा अंदाज काहीसा हटके आहे.

या ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, नव्या सिनेमाचा पहिला दिवस आणि हालत खराब. नर्व्हस. बिग बींचे हे ट्विट काहीसे आश्चर्यकारक आहे. अनेक दशकांपासून बॉलिवूड गाजवलेल्या अभिनेत्याला आजही नव्या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी नर्व्हस वाटते. हे आश्चर्यकारक असले तरी यातून बिग बीं चे कामाप्रती असलेले गांभीर्य दिसून येते. अतिआत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट न करता नवा प्रोजेक्ट नव्याने करण्याची तयारी यातून दिसते. (कोरोना व्हायरस वरील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला आनंद, ट्विट करत दिली 'ही' माहिती)

पहा व्हिडिओ:

बिग बींच्या या ट्विटवर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ने लिहिले की, सर हे तर मी म्हटले पाहिजे. तुमच्या सोबत काम करण्यासाठी मी खूप नर्व्हस आणि उत्साहीत आहे. दरम्यान, अजय देवगन चा हा सिनेमा 22 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल.