Alia Bhatt Daughter Name: आलिया भट्ट-रणबीर कपूर ने  आपल्या मुलीचं ठेवलं 'हे' नाव: अभिनेत्रीने पोस्ट शेअर सांगितला नावाचा अर्थ
Alia-Ranbir and his Daughter Raha (PC - Instagram)

Alia Bhatt Daughter Name: आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 6 नोव्हेंबर 2022 रोजी पालक झाले. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे सध्या कपूर आणि भट्ट कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. या बातमीने चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. मुलीच्या जन्मापासूनच चाहते वाट पाहत होते की, आलिया आणि रणबीर मुलीचे नाव काय ठेवणार? आता याचा खुलासा झाला आहे. आलियाच्या मुलीचे नाव 'राहा' (Raha) कपूर ठेवण्यात आले आहे. राहाची आजी म्हणजेचं अभिनेत्री नीतू कपूरने आपल्या नातीचं नाव ठेवलं आहे.

आलिया भट्टने आज तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. तिने एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर मुलीला हातात धरलेले दिसत आहेत. तसेच भिंतीवर टी-शर्टवर आलिया-रणबीर कपूरच्या मुलीचे नाव लिहिलेले दिसत आहे. या पोस्टद्वारे आलिया भट्टने आपल्या मुलीचे नाव राहा कपूर ठेवल्याचे सांगितले आहे. हे नाव रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांनी निवडले आहे. (हेही वाचा -Fact Check: सोशल मीडीयामध्ये वायरल झालेला Alia Bhatt आणि तिच्या लेकीचा फोटो खोटा; इथे जाणून घ्या सत्य)

आलिया भट्टने पोस्टसोबत एक लांबलचक नोट लिहिली आहे. याद्वारे तिने मुलीच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. तिने लिहिले आहे की, 'मुलीचे नाव राहा ठेवले आहे. हे नाव तिला तिच्या अद्भुत आणि प्रिय आजीने दिलं आहे. या नावाचे अनेक सुंदर अर्थ आहेत. याचा अर्थ - दिव्य मार्ग. स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद. तर संस्कृतमध्ये ते गोत्र आहे. बंगालीमध्ये या नावाचा अर्थ आराम आहे. अरबी भाषेत याचा अर्थ शांतता असा होतो. यासोबतच आनंद, स्वातंत्र्य हेही या नावाचे अर्थ आहेत. आलियाने पुढे लिहिले की, ती तिच्या नावाशी पूर्णपणे बरोबर आहे. राहा, आमचे कुटुंब, आमच्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. असं वाटत आहे की, आता आपलं जीवन सुरू झालं आहे. (हेही वाचा - अभिनेत्री Alia Bhatt ने नुकतेच पोस्ट केले Classic Photos, व्हाईट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसून आली Bold, पाहा फोटो)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया भट्टने तिच्या आई झाल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केले होती. ज्यामध्ये सिंह-सिंहिणी आणि शावकांचा फोटो होता. यासोबत तिने मुलीच्या जन्माची माहिती शेअर केली होती. आलिया आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते.