Welcome 2021: आलिया भट्ट-रणबीर कपूर समवेत बॉलिवूडमधील 'हे' कपल्स 2021 मध्ये होऊ शकतात विवाहबद्ध!
Ranbir Kapoor-Alia Bhatt and Arjun Kapoor-Malaika Arora (Photo Credits: Instagram)

2020 हे वादळी वर्ष ठरलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे जिवीतहानी मोठ्या प्रमाणावर झाली. तर लॉकडाऊनमुळे (Lockdown) आर्थिक चक्र बिघडले. इतकंच नाही यासोबत या वर्षात अनेक नवनव्या समस्यांनी डोके वर काढले. या सगळ्यामुळे अनेकांनी मोठमोठे प्लॅन्स रद्द केले. तर काहींनी त्यात काहीसे बदल केले. बॉलिवूडमधील अनेक कपल्स देखील 2020 मध्ये विवाहबद्ध होतील, असे वाटत होते. मात्र कोरोना संकटामुळे किंवा इतर कारणांमुळे कदाचित लग्नाची योजना पुढे ढकलण्यात आली असावी. त्यामुळे 2021 मध्ये हे कपल्स विवाहबद्ध होतील, असे बोलले जात आहे. तर पाहुया यादीत कोणकोणते सेलिब्रिटीज आहेत... (Ranbir Kapoor and Alia Bhatt Marriage: आलिया भट्टसोबतच्या लग्नाबाबत रणबीर कपूरचा खुलासा, '...तर यावर्षी आमचे लग्न झाले असते.')

आलिया भट्ट-रणबीर कपूर (Alia Bhatt- Ranbir Kapoor):

बॉलिवूड कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. कौटुंबिक कार्य असो वा सार्वजनिक कार्यक्रम या दोघांना बर्‍याचदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. रणबीर आणि आलिया दोघेही यान मुखर्जी यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटावर काम करत आहेत. दरम्यान, नुकत्याच पत्रकार राजीव मसंद यांच्याशी झालेल्या संभाषणात रणबीरने आपल्या वडिलांना गमावल्याच्या वेदनेतून अद्याप बाहेर आलेला नाही हे सांगितले. तसंच याद्वारे कोरोना संकट नसते तर त्याचे लग्न झाले असते, असेही तो म्हणाला. त्यामुळे 2021 मध्ये रणबीर-आलिया लग्न करू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

अर्जुन कपूर-मलाइका अरोड़ा (Arjun Kapoor-Malaika Arora):

2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या डेटिंगच्या बातम्या मीडियामध्ये झळकू लागल्या. मलायका आणि अर्जुनने त्यांच्या नात्याची खुलेपणाने पुष्टी दिलेली नसली तरी सोशल मीडियावरील त्यांचे रोमँटिक फोटोतून त्यांचे नाते लपलेले नाही. त्यामुळे 2021 मध्ये हे कपल देखील विवाहबद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallarjun (@arjunmalaika)

अरबाज खान-जॉर्जिया एंड्रियानी (Arbaaz Khan-Giorgia Andriani):

बॉलिवूड अभिनेता अरबाज खाननेही मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रानी यांना डेट करण्यास सुरुवात केली. अरबाज देखील जॉर्जियाशी लग्न करण्याचा विचार करत आहे आणि त्यासाठी आपल्या कुटुंबीयांनाही पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी सध्या चर्चा आहे. त्यामुळे 2021 मध्ये ते दोघेही त्यांच्या नव्या नात्याची सुरुवात करु शकतात.

वरुण धवन-नताशा दलाल (Varun Dhawan-Natasha Dalal):

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याची मैत्रिण नताशा दलाल नावाच्या महिलेला डेट करत आहे. नताशा चित्रपटसृष्टीशी संबंधित नसल्याने ती माध्यमांच्या चर्चेपासून दूर राहणे पसंत करते. नताशा व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. वरुण आणि नताशाच्या डेटिंगच्या चर्चा मीडियात अनेकदा रंगल्या आहेत. ते दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असून वरुण आणि नताशा 2021 मध्ये विवाहबद्ध होऊ शकतात.

आदर जैन-तारा सुतारिया (Aadar Jain-Tara Sutaria):

रणबीर कपूरचा कझिन भाऊ आदिर जैन अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत आहे. ताराने 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आदर आणि तारा व्हेकेशन्स तसंच कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही एकत्र दिसतात. आज ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने तारा कपूर कुटुंबासमवेत दिसली. आता चाहत्यांना आशा आहे की 2021 मध्ये हे दोघेही लग्न करतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

दरम्यान, 2020 हे वर्ष संकटात गेल्याने 2021 या येणाऱ्या नववर्षाकडून सर्वांनाच मोठी आशा आहे. अपूर्ण राहीलेल्या इच्छा, आकांक्षा, प्लॅन्स नववर्षात पूर्ण करण्यासाठी सर्वजण 2021 ची आतुरतेने वाट पाहत आहेत.