(Photo Credit - Twitter)

टी २० वर्ल्डकपमधील (T-20 WC) उपांत्य फेरीची चुरस रंगतदार वळणावर आली आहे. ग्रुप २ मधून पाकिस्ताननं (Pakisthan) आपलं स्थान उपांत्य फेरीत निश्चित केलं आहे. मात्र दुसऱ्या संघासाठी न्यूझीलंड, (New Zealand) भारत (India) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afganisthan) चुरस आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचं गणितं न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यावर अवलंबून आहेत. न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास थेट उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. मात्र अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यास उपांत्य फेरीसाठी धावगती महत्वाची ठरणार आहे. यामुळेच 7 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी जेव्हा अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडसमोर खेळत असेल तेव्हा संपूर्ण भारत त्यांच्या पाठिशी असेल. (हे ही वाचा IND vs SCO 2021: केएल राहुलची बॅट तळपली, विश्वचषकात वेगवान अर्धशतक करणारा बनला दुसरा भारतीय; बुमराह T20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज.)

अफगाणिस्तानसाठी भारतीय चाहत्यांच्या पाठिंब्याचं सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणे मीम्सचा पाऊस पडत आहे. विविध प्रकारचे मीम्स बनवले जात आहेत. कुणी भारत-अफगाणिस्तान मैत्रीची तुलना शोलेच्या जय आणि वीरूसोबत करत आहे, तर कोणी अफगाणिस्तानच्या समर्थकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे सांगत आहे.

पहिल्या दोन सामन्यात लज्जास्पद पराभवाला सामोरे गेल्यावर भारतीय संघाने (Indian Team) पुढील दोन सामन्यात विजयासह शानदार पुनरागमन केले आहे. दुबई येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने T20 विश्वचषकातील आपला दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे.