Year End 2021: यावर्षी 'या' Web Seriesने जिंकली प्रेक्षकांची मन, जाणून घ्या संपूर्ण यादी
(Photo Credit - Twitter)

दरवर्षी अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होतात. कोविडमुळे 2 वर्षांपासून चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत नव्हते. मात्र, कोविडची प्रकरणे कमी झाल्यानंतर आता चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. तसेच या वर्षी काही वेब सीरिज ने आपला धमाका दाखवला आहे. अनेक जबरदस्त विषयावर बेव सीरिज OTT प्लॅटफॉर्मवर प्रर्दर्शित झाली. आता आम्‍ही तुम्‍हाला या वर्षीच्‍या वेब सीरिज बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी समीक्षकांचीच नाही तर प्रेक्षकांचीही मन जिंकली आहेत. या यादीमध्ये  OTTवर प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजचा समावेश आहे. (हे ही वाचा IMDB Top 10 Indian Films 2021: 'जय भीम' आणि 'शेरशाह' IMDBच्या यादीमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी, पाहा चित्रपटांची यादी.)

या वर्षातील वेब सीरिजची यादी -

Aspirants

TVFच्या या वेब सिरीजमध्ये 5 भाग होते या सीरिज प्रत्येक चांहत्याच्या पंसतीस उतरली. सीरिज सुरू झाल्यापासून, त्याच्या कथानकाने आणि कथेने प्रेक्षकांना पडद्यावर खिळवून ठेवले. त्याची कथा UPSC इच्छुक आणि त्यांचा प्रवास, जीवन आणि संघर्ष यावर आधारित आहे. अभिलाष, धूमकेतू आणि गौरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या सीरिजला IMBD मध्ये 9.7 रेटिंग मिळाले आहे.

Kota Factory 2

भारतातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या वेब सीरीजमध्ये कोटा फॅक्टरीचा समावेश आहे. कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांवरील दबावाची आणि त्यांना करावा लागणाऱ्या संघर्षाची कथा चांगल्या पध्दतीने या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.

Dhindora

धिंडोरा हा एक फॅमिली ड्रामा शो आहे ज्यामध्ये YouTube स्टार भुवन बाम मुख्य भूमिकेत दिसला होता. हिमांक गौर यांनी या शोचे दिग्दर्शन केले आहे. यात बबलू, जानकी आणि भुवन या मध्यमवर्गीय माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. भुवनने ही तीन पात्रे साकारली आहेत आणि याशिवाय उर्वरित सहा पात्रे. IMDb मध्ये धिंडोराला 9.6 रेटिंग मिळाले आहे.

The Family Man 2

फॅमिली मॅन 2 पहिल्या भागाप्रमाणेच खूप आवडला आहे. या मालिकेत मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत असून त्याचे नाव आहे श्रीकांत तिवारी. श्रीकांत राष्ट्रीय तपास संस्थेत काम करतो. दहशतवाद्यांपासून आपल्या देशाचे रक्षण करताना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कशा अडचणी येतात हे यात दाखवण्यात आले आहे. या सीरिजला IMDb मध्ये 8.8 रेटिंग मिळाले आहे.

Aarya 2

सुष्मिता सेनच्या आर्या शोचा दुसरा भाग यावर्षी रिलीज झाला आहे. गेल्या वर्षी हाहाकार माजवल्यानंतर या शोच्या दुसऱ्या भागाने यंदाही आपली जबरदस्त ताकद दाखवली. या शोमध्ये सुष्मिताचा गँगस्टर अवतार पाहायला मिळाला होता.

Mumbai Diaries 26/11

मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यावर अनेक चित्रपट आणि शो बनले असले तरी यावर्षी प्रदर्शित झालेला मुंबई डायरीज 26/11 हा शो चांगलाच पसंतीस उतरला आहे. या मालिकेत मोहित रैना, कोकण सेन, नताशा भारद्वाज, श्रेया धन्वंतरी आणि सत्यजित दुबे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Gullak

या वर्षी प्रदर्शित झालेली गुलक 2 ही वेबसिरीजही चर्चेत होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबाबद्दल दाखवले आहे. पहिला सीझन 2019 मध्ये रिलीज झाला होता, मात्र या वर्षी रिलीज झालेला दुसरा सीझन सर्वाधिक आवडला आहे.

Grahan

ग्रहण वेबसीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. सत्य घटनेवर आधारित या वेबसीरिजमध्ये 1984 च्या दंगलीचे सत्य दडले आहे