Rudra Edge Of Darkness: प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला रिलीज होणार अजय देवगणची पहिली वेब सीरिज 'रुद्र', पाहा नवा ट्रेलर
Rudra Edge Of Darkness (फोटो सौैजन्य - इन्स्टाग्राम)

Rudra Edge Of Darkness: अजय देवगण (Ajay Devgn) ची डेब्यू वेब सिरीज 'रुद्र - द एज ऑफ डार्कनेस'ची (Rudra Edge Of Darkness) रिलीज डेट समोर आली आहे. सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमाद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अजय देवगणसह चित्रपटाचे स्टारकास्ट उपस्थित होते. रुद्र - द एज ऑफ डार्कनेस ही एक क्राईम सीरिज आहे. ज्याचे दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 4 मार्च रोजी प्रसारित होणार आहे. या सीरिजमध्ये अजय पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, मात्र यावेळी त्याची स्टाइल सिंघमची नाही. हा पोलिस अधिकारी खाकी घालून काम करत नाही, तर पांघरूण घालून, मुंबईच्या गुन्हेगारीच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये गुन्हेगारांना शोधतो. 6 भागांच्या सीरिजमध्ये अजयच्या पात्राचे नाव रुद्रवीर सिंह आहे. रुद्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही गोंधळलेला आहे. ईशा देओल, राशी खन्ना, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, मिलिंद गुणाजी आणि ल्यूक केनी या मालिकेत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

रुद्र - द एज ऑफ डार्कनेसचा ट्रेलर दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झाला होता. रुद्र हा ब्रिटिश टीव्ही शो ल्यूथरचा भारतीय रूपांतर आहे. इद्रिस एल्बा यांनी नील क्रॉस-रचित मालिकेत DCI जॉन ल्यूथरची भूमिका साकारली होती. इद्रिस एका गुप्त पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. एलिस मॉर्गनने रुथ विल्सनची भूमिका केली होती. 2010 ते 2019 दरम्यान या शोचे 5 सीझन झाले होते. पहिल्या सीझनमध्ये 6 एपिसोड होते. ते बीबीसी वनवर प्रसारित झाले. रुद्र सीरिजची अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट आणि बीबीसी स्टुडिओ यांनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे. (वाचा - Valentine Day 2022: Malaika Arora ने Arjun Kapoor ला दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या खास शुभेच्छा, पहा फोटो)

हॉटस्टारने यापूर्वी ब्रिटिश सीरिज डॉक्टर फॉस्टर्स आउट ऑफ लव्ह आणि क्रिमिनल जस्टिलचे याच शीर्षकासह भारतीय रूपांतर आणले आहे. ही सीरिज हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

रुद्र सीरिजच्या आधी, अजय 25 फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या आलिया भट्ट स्टारर संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रुद्रनंतर अजय 25 मार्चला रिलीज होणाऱ्या आरआरआर चित्रपटातही एका खास भूमिकेत दिसणार आहे. अजयचा प्रोडक्शन-दिग्दर्शित चित्रपट रनवे 34 एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. याशिवाय मैदानही याच वर्षी रिलीज होणार आहे.