Valentine Day 2022: Malaika Arora ने Arjun Kapoor ला दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या खास शुभेच्छा, पहा फोटो
Malaika Arora, Arjun Kapoor (PC - Instagram)

Valentine Day 2022: आज प्रेमाचा दिवस आहे. प्रत्येकजण आजचा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करत आहे. व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) च्या निमित्ताने प्रत्येकजण आपलं प्रेम व्यक्त करतो आणि आपल्या जोडीदारासाठी खास बनवण्याचा प्रयत्न करतो. बॉलीवूड सेलिब्रिटी देखील व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्यांचे प्रेम व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. अभिनेत्री मलायका अरोरानेही (Malaika Arora) या दिवसाची सुरुवात रोमँटिक पद्धतीने केली आहे. तिने तिचा प्रियकर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ला व्हॅलेंटाइन डेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने रोमँटिक पद्धतीने अर्जुनवरील प्रेम व्यक्त केले आहे. मलायकाच्या या पोस्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मलायका तिचे प्रेम व्यक्त करण्याच्या मूडमध्ये आहे.

मलायकाने अर्जुन कपूरसोबतची एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने अर्जुनला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अर्जुन मलायकाच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. या क्यूट फोटोला त्यांच्या चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. (वाचा - Valentine's Day 2022 Google Doodle: वेलेंटाईन डे च्या शुभेच्छा देण्यासाठी गूगलवर आज खास 3D Game Challenging डूडल!)

हा फोटो शेअर करताना मलायकाने Mine असं लिहिलं आहे. हार्ट इमोजीही पोस्ट केला. फोटोमध्ये मलायका शॉर्ट्स आणि टॉप घातलेली दिसत आहे. त्याचवेळी अर्जुनने जॉगर आणि टी-शर्ट घातला आहे. मलायकाच्या या पोस्टला काही मिनिटांत लाखो लोकांनी लाईक केले आहे. मलायकाच्या या पोस्टवर तिचे चाहतेही कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे, सुंदर जोडपे आणि दुसऱ्याने हार्ट इमोजी पोस्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील सर्वात हॉट कपल्सपैकी एक आहेत. दोघांनीही आपलं नातं कोणापासून लपवलं नाही. दोघेही सोशल मीडियावर एकत्र रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच दोघेही डिसेंबर 2021 मध्ये व्हेकेशन साजरे करण्यासाठी मालदीवला गेले होते. जिथे दोघांनी सोशल मीडियावर रोमँन्टिक फोटो शेअर केले होते.