Viral Post : अजय देवगणने चुकून शेअर केला काजोलचा मोबाईल नंबर....
अजय-काजोल (File Photo)

बॉलिवूडचा सुपरहीट अभिनेता अजय देवगणने केलेल्या एका चुकीमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. अजय देवगणने चुकीने आपल्या पत्नीचा अर्थात बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केला आहे. अजयने मोबाईल नंबर शेअर केल्यावर लगेचच हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अजय देवगणकडून इतकी मोठी चूक झालीच कशी, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

या सगळ्या गोंधळानंतर अजयचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. अजयने काजोलचा मोबाईल नंबर शेअर करत लिहिले की, काजोल देशात नाही आहे, अशावेळी या नंबरवरुन तुम्ही तिच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधू शकता.

यापूर्वी शाहिद कपूर, कृती सेनन, मिका सिंग, तुषार कपूर आणि अनुपम खेर यांसारख्या सेलिब्रेटींचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहेत.

पण यावेळेस अजय देवगणचे ट्विटर अकाऊंट हॅक झालेले नसून हा सर्व प्रॅन्क असल्याचे अजयने ट्विट करुन सांगितले. सिनेमाच्या सेटवरुन हा प्रॅन्क करण्यात आला होता. तुम्हीही त्याची मज्जा घ्या.

काजोल लवकरच हेलीकॉप्टर ईला या सिनेमात झळकेल. त्यात काजोल एका महात्त्वाकांक्षी आईची भूमिका साकारत आहे.