मिताली राजला खेलरत्न मिळाल्यावर तापसीने केले कौतुक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
Taapsi Pannu (Photo Credit - Instagram)

भारतीय (India) महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) मिताली राजचे (Mithali Raj) अभिनंदन केले आहे. यासोबतच तिचे कौतुकही केले आहे. मिताली राज ही खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिचा आगामी चित्रपट 'शाबाश मिथु'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ही अभिनेत्री भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराला सन्मान करतानाचा एक व्हिडिओ तापसीने ट्विट केला आहे, आणि म्हटले आहे की "तिच्या कौतुकाची ही सविस्तर ओळख ऐकून मला असे वाटते की ती केवळ एका चित्रपटासाठी नव्हे तर तिच्या स्वत: च्या बळावर पूर्ण मालिकेसाठी पात्र आहे." ती पुढे म्हणाली कि, "हे खूप प्रेरणादायी आहे." (हे ही वाचा ‘लपाछपी’ सिनेमाचा बॉलिवूड रिमेक, झळकणार ही अभिनेत्री.)

तापसीने नुकतेच शाबाश मिथुचे शूटिंग पूर्ण केले आहे. तापसीने अजुन एक ट्विट शेअर केले आहे.

पुढील ICC महिला क्रिकेट विश्वचषक मार्च-एप्रिल 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये होणार आहे. राज यांच्या नेतृत्वाखाली भारतासोबत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय असलेल्या बायोपिकसाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. 'शाबाश मिथु'चे दिग्दर्शन सुजित सरकार करत आहेत. तापसी पन्नु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या फिटनेसचे रहस्य आगामी प्रोजेक्ट्स शेअर करते. आपला दृष्टिकोन निर्दोष ठेवण्यासाठी तापसी पन्नु ओळखली जाते.