नेहा धूपिया अंगद बेदी (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अभिनेता अंगद बेदी (Angad Bedi) यांना पुन्हा एकदा अपत्यप्राप्ती झाली आहे. नेहा धुपियाने रविवारी एका मुलाला जन्म दिला. अंगद बेदीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. नेहा धुपिया आणि अंगद यांना मेहर नावाची मुलगी आहे. आता नव्या बाळाची ही बातमी समजल्यावर नेहा आणि अंगदचे चाहते आणि बॉलिवूड स्टार्स सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन करत आहेत. अंगद बेदीने पत्नी नेहा धुपियासोबत एक रोमँटिक फोटो शेअर केले आहे.

जुलै महिन्यात नेहा आणि अंगदने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांसोबत नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती दिली होती. त्या फोटोमध्ये पती अंगद बेदी आणि मुलगी मेहर नेहासोबत दिसले होते. आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने सर्वजण आनंदी आहेत. अंगदने बाळ व नेहा सुखरूप असल्याचेही सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ANGAD BEDI (@angadbedi)

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी मे 2018 मध्ये लग्न केले होते. विशेष गोष्ट म्हणजे त्याच वर्षी 18 नोव्हेंबर रोजी हे दोघे मुलगी ‘मेहर’चे पालक झाले. लग्नाआधी नेहा गर्भवती होती आणि जेव्हा नेहाने ही बातमी दिली तेव्हा ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अशा परिस्थितीत आता नेहा पुन्हा आई झाल्याच्या बातमीने तिचे चाहते खूप आनंदी आहेत. (हेही वाचा: Alia Bhatt हिच्या विरोधात मुंबईत FIR दाखल, 'या' कारणामुळे वाढली समस्या)

नेहा धुपिया सिंग इज किंग, तुम्हारी सुलू, हिंदी मीडियम, कयामत आणि लस्ट स्टोरी या चित्रपटांसाठी ओळखली जाते. अभिनेत्री शेवटची प्रियांका बॅनर्जीच्या देवी या लघुपटात दिसली होती. काजोल, श्रुती हासन, नीना कुलकर्णी आणि शिवानी रघुवंशी यांनीही यात काम केले आहे. याशिवाय नेहा ‘रोडीज’ सारखा शोदेखील जज करते. त्याचवेळी, अंगद बेदी हिना खानसोबत 'मैं भी बर्बाद' या म्युझिक व्हिडिओमध्ये शेवटचा दिसला होता. तर अंगदचा शेवटचा चित्रपट ‘गुंजन सक्सेना’ होता.