Shahrukh Khan (Photo Credits-Instagram)

देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे (Coronavirus) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईमध्ये (Mumbai) तर दिवसाला 800 पेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. मुंबईमध्ये करण जोहरने दिलेल्या वाढदिवसाच्या ग्रँड पार्टीनंतर मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार होत असल्याचे अहवाल सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अलीकडेच आदित्य रॉय कपूरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्याचवेळी आता बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

अहवालानुसार शाहरुख खानची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर किंग खानने स्वतःला स्वतःच्या घरात क्वारंटाइन केले आहे. शाहरुखशिवाय अलीकडे अक्षय कुमारलाही या विषाणूने ग्रासले होते मात्र आता तो ठीक आहे.

दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कतरिना गेल्या आठवड्यात साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंगला सुरुवात करणार होती. मात्र कतरिना कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आता चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळेच कॅट पती विकी कौशलसोबत अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड सोहळ्याला उपस्थित राहू शकली नाही. माहितीनुसार कतरिना कैफ कोरोनामधून बरी झाली आहे. (हेही वाचा: करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मुंबईमध्ये कोरोनाचा विस्फोट? जवळच्या सूत्रांनी दिले 'हे' स्पष्टीकरण)

दरम्यान, 25 मे रोजी करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ग्रँड पार्टीने इंडस्ट्री आणि परिणामी मुंबईमध्ये कोरोना पसरवल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार पार्टीमधील जवळपास 50 ते 55 सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. या पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान उपस्थित होता.