चित्रपट दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने (Karan Johar) 25 मे 2022 रोजी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी करण जोहरने मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये ग्रँड पार्टी दिली. या पार्टीत आमिर खान, शाहरुख खान ते सलमान खानसह बॉलिवूडचे अनेक स्टार्स दिसले. ही पार्टी जणू काही 'बॉलिवूड रियुनियन' ठरली. त्यानंतर अचानक मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढू लागली. कार्तिक आर्यन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीसपासून आदित्य रॉय कपूरपर्यंत अनेक स्टार्स कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.
रिपोर्टनुसार करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेले 40 ते 50 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. इतकेच नाही तर करण जोहरच्या पार्टीला 'हॉटस्पॉट'ही म्हटले जात आहे. याबाबत सोशल मिडियावर बरीच टीकाही होत आहे. अशात या गॉसिप्सवर करण जोहरशी संबंधित सूत्रांची प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, करण जोहरच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, 'पार्टीसंबंधीचूं बातम्या अफवा आहेत. सध्या करण जोहर 'कॉफी विथ करण'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या शोसाठी RTPCR चाचणी अनिवार्य आहे. सेटवर सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत.’
सूत्राने पुढे सांगितले की, ‘50 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. ही केवळ अफवा आहे. या पार्टीला 10 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. आतापर्यंत फक्त आदित्य रॉय कपूरनेच आपणाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. पार्टीला आलेले बहुतेक सेलिब्रिटी पार्टीनंतर अनेक ठिकाणी बाहेर गेले आहेत. काहीही कारण असले तरी मुदाम करण जोहरचे नाव त्यात गोवले जाते.’ (हेही वाचा: कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण; IIFA Awards मध्ये सहभागी होणार नाही)
दरम्यान, प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानी याने देखील करण जोहरच्या पार्टीबद्दल पोस्ट केली होती. या पोस्टनंतर बातम्यांना अधिकच वेग आला. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर 55 पाहुणे कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.