Dilip Kumar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पत्नी Saira Bano ने मानले चाहत्यांचे आभार (See Pics)
Dilip Kumar Discharged from Hospital (Photo Credits: Twitter)

Dilip Kumar Discharged from Hospital: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई (Mumbai) मधील पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये (PD Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यावेळेसचे काही फोटोज समोर आले आहेत. यात दिलीप कुमार स्ट्रेचरवर झोपलेले दिसत आहेत. सोबत पत्नी सायरा बानो (Saira Bano) देखील आहेत.

दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने पत्नी सायरा बानो यांनी सर्व चाहत्यांचे, शुभचिंतकांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, "आम्ही खूप खूश आहोत. दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून फ्लुईड काढण्यात आले आहे. आता आम्ही घरी जात आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी मी सर्वांना धन्यवाद देते." (Dilip Kumar Health Update: दिलीप कुमार यांना bilateral pleural effusion चे निदान; प्रकृती स्थिर)

ANI Tweet:

Yogen Shah Pics:

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

दिलीप कुमार हे 98 वर्षांचे असून गेल्या अनेक काळापासून त्यांची प्रकृती नाजूक झाली आहे. त्यांना नियमित हेल्थ चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. दरम्यान, या सर्व काळात पत्नी सायरा बानो त्यांची व्यवस्थित काळजी घेताना दिसतात.