बॉलिवूड सिंघम फेम अजय देवगण (Ajay Devgan) ने आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोशल मिडियावर आपला एक खास फोटो शेअर करुन सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त देशभरात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers Day) म्हणून साजरा केला जात आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षकांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याप्रमाणेच अजय देवगणने आपल्या लाडक्या गुरुंचा उल्लेख करत त्याच्या या गुरूंनी त्याला रोज नवनवीन गोष्टी शिकवल्या किंबहुना शिकवत आहेत असे म्हटले आहे.
अजय देवगणचा हा गुरु दुसरा तिसरा कुणी नसून कॅमेरा आहे. म्हणून त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला कॅमे-यासोबतचा फोटो शेअर करुन त्याखाली सुंदर मेसेज लिहिला आहे.
'शिक्षक दिनानिमित्त मी माझ्या कॅमे-याला वंदन करतो. मला नेहमी असे जाणवते की मी जेव्हा जेव्हा त्याच्या मागे असतो तेव्हा नेहमी नवनवीन गोष्टी शिकत असतो. हे चक्र सातत्याने सुरु आहे. जी एक प्रकारची प्रक्रियाच आहे' असे अजयने या पोस्टखाली लिहिले आहे.
अजय देवगण याच्या कामामविषयी बोलायचे झाले तर, लवकरच तो आपल्याला भुज द प्राइड ऑफ इंडिया आणि मैदान या चित्रपटातून दिसणार आहे.