Weekend Web series August 2023: नुकतेच प्रदर्शित झालेले हे वेब सीरिज ओटीटीवर पाहू शकता. या विकेंडला काही फॅमेली सोबत तर काही एकट्याने पाहावे असे वेब सीरिज प्रदर्शित झाले आहे. या विकेंडला नक्की पाहा हे वेबसीरिज
१. डेप वर्सेस हर्ड- सुप्रसिद्ध हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या केसवर आधारित 'डेप वर्सेस हर्ड' ही डॉक्यु सीरिज 16 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे. ही डॉक्यु सीरीज तीन भागांमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केले जाईल.
२. ताली - सुष्मिता सेन हीचा ताली ही वेब सीरिज १५ ऑगस्टला रिलीज झाली. फॅमेली टाईम म्हणून ही वेब सीरिज पाहू शकता. अभिनेत्री सुष्मिता हीने या सीरिजमध्ये कमालीचे काम केले आहे.दिग्दर्शक रवी जाधव या वेब सीरिजचं दिग्दर्शिन केलं आहे. क्षितीज पटवर्धन यांनी आ वेब सीरिजचं लेखन केलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिजचं अनेकजण कौतुक करत आहे.
३.गन अँड गुलाब्स - बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव, दुल्कर सलमान, गुलशन दैवेया आणि आदर्श गौरव यांसारख्या स्टार्स असलेली गन अँड गुलाब्स ही वेब सीरिज 18 ऑगस्टला रिलीज होत आहे. या सीरिजमधील शेवटचा एपिसोड सर्वात भारी असल्याते सांगितले जात आहे.
४.द चूझन वन- नेटफ्लिक्सवर 16 ऑगस्ट रोजी ही सीरिज रिलीज झाली. या सीरिजमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे.
५. द मंकी किंग- नेटफ्लिक्सवर ही १८ ऑगस्टला सीरिज रिलीज झाली आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सोबत एनिमेटे सीरिज पाहणाऱ्यासाठी ही सीरीज बेस्ट आहे.