Bigg Boss Season 13: यंदा 'बिग बॉस 13' च्या पर्वात राखी सावंत-दीपक कलाल यांचा Live रोमान्स पाहायला मिळणार?
राखी सावंत आणि दीपक कलाल (Photo Credits-Instagram)

येत्या काही पुढील महिन्यात बिग बॉस 13 (Bigg Boss 13)  च्या पर्वाला सुरुवात होणार आहे. तर नेहमीच बिग बॉस हा चर्चेत राहिलेला रिअॅलिटी शो आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात एखादा स्पर्धक हा वादग्रस्त व्यक्तिमत्वाचा असल्याचे दिसून आले आहे. तत्पूर्वी यंदाच्या बिग बॉस 13 च्या पर्वात प्रत्येकवेळी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी राखी सावंत (Rakhi Sawant) दिसून येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचसोबत तिचा लाइव्ह रोमान्स दीपक कलाल (Deepak Kalal)  याच्यासोबत पाहायला मिळणार असल्याच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये दीपक कलाल दिसून येत आहे. तर काही दिवसांपूर्वी दीपक कलाल आणि राखी सावंत यांच्या प्रेमसंबंधाबद्दल जोरदार चर्चा झाली होती. तसेच या दोघांनी लग्न करणार असल्याचा गाजावाजा सुद्धा सोशल मीडियात केला होता. त्यानंतर राखी आणि दीपक यांना एकत्र विविध कार्यक्रमांसाठी एकत्र उपस्थिती लावली होती. तसेच या दोघांची जवळीक या दरम्यान अधिक वाढली असल्याचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियात पाहायला मिळाले होते.

तर आता दीपक कलाल याने सुद्धा इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात राखी सावंत दिसून येत आहे. या फोटोखाली दीपकने सलमान खान आणि कलर्स चॅनलचे आभार मानले आहेत. त्याचसोबत लाइव्ह सुहागरात बिग बॉसच्या घरात होणार असल्याचे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

Thank You Salman Khan and Colours......Live Suhaagrat hogi ab Big Boss house me... R U Excited? @deepakkalalofficial @rakhisawant2511

A post shared by Deepak Kalal (@deepakkalalofficial) on

मात्र या दोघांच्या अशा पोस्टमुळे नेटकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सलमान खान आणि बिग बॉसच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा या दोघांनी घोळ घातला असल्याने इन्स्टाग्रामवरील पोस्ट फेक असल्याचे काहींचे म्हणणे आहे.