Siddharth Badve (PC - Twitter)

पुण्यातील मराठी दिग्दर्शक सिद्धार्थ बडवे (Siddharth Badve) लवकरचं 'एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर' (Escape from Black Water) या हॉलिवूडपटात (Hollywood Movie) झळकणार आहेत. चित्रपटांत काम करणारे कलाकार आपल्या कलेच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतात. मात्र, पडद्यामागचे लोक कधीचं प्रसिद्धी झोतात येत नाहीत. मात्र, सिद्धार्थ याला अपवाद ठरला आहे. 'एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर' या चित्रपटात सिद्धार्थ प्रमुख भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात काम करणारा तो एकमेव भारतीय असणार आहे.

सिद्धार्थला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. तो बालनाट्यांमध्ये काम करत आपली अभिनयाची बाजू विकसित करत होता. सिद्धार्थच्या वडीलांनी त्याला आधी शिक्षण आणि नंतर छंद, असं बजावलं होतं. सिद्धार्थने पुण्यातून आर्किटेक्चरची पदवी घेत आपली कला विकसित केली. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिद्धार्थने 'मशीन' या हिंदी चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. (हेही वाचा - नरेंद्र मोदी यांची स्तुती करत अमृता फडणवीस यांनी शेअर केला नवा व्हिडिओ; मोदींनी दिले असे उत्तर (Watch Video))

अभिनेता होण्याचे स्वप्न बाळगून असलेला सिद्धार्थ सहाय्य्क दिग्दर्शन करताना अभिनयाचे अनेक पैलू शिकत होता. सिद्धार्थने 'हृदयांतर' या मराठी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. तसेच सध्या तो 'लग्न कल्लोळ' या आगामी चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन करत आहे. एलिस फ्रेझीर हे ‘एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी उत्तम कलाकाराच्या शोधात होते. यावेळी आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता छायाचित्रकार दिलशाद व्ही. ए. यांनी सिद्धार्थचं नाव सुचवलं. त्यानंतर एलिस यांना सुद्धार्थचा अभिनय आवडला आणि त्यांनी ‘एसकेप फ्रॉम ब्लॅक वॉटर’ या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेसाठी सिद्धार्थची निवड केली.