अनुप जलोटा बिग बॉसमधून बाहेर? अमृता फडणवीस यांच्या सोबत कार्यक्रमाला उपस्थिती
फोटो सौजन्य- अमृता फडणवीस ट्विटर

सध्याच्या बिग बॉस-12 च्या सिझनमधील जेष्ठ संगीतकार अनुप जलोटा आणि त्यांची 28 वर्षाची गर्लफ्रेंड जसलिन यांच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये नेहमीच रंगत असतात. मात्र खरच अनुप जलोटा हे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेत का? असा प्रश्न सर्व नेटकऱ्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी अनूप जलोटा सोबत एका कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचा एक फोटो ट्विट केला होता. त्यामुळे आता बिग बॉसच्या कार्यक्रमावर प्रश्न उभे राहत आहेत.

राहमते नावाच्या एका चॅरिटीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी अनुप जलोटा आणि अमृता फडणवीस एकत्र दिसून आले आहेत. तसेच या कार्यक्रमावेळी इतर गायक मंडळीसुद्धा उपस्थिती होते. तर अमृता फडणवीस यांनी फोटोच्या माध्यमातून ट्विट केले आहे त्याखाली संगीत क्षेत्रातील मंडळींकडून गरीबांना आर्थिक व वैद्यकिय मदत देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

परंतु बिग बॉसच्या शोमधून अनुप जलोटा नेहमीच प्रेक्षकांना दिसत असतात. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे ते खरे आहे की खोटे याचा थांगपत्ता लागत नाही आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी बिग बॉस हे फेक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.