Ajay Devgn RRR Look: अजय देवगण चा ‘RRR’ लूक त्याच्या बर्थ डे  दिवशी झाला रिलीज (Watch Video)
Ajay Devgan | Photo Credits: Twitter/ Ajay Devgan

बर्थ डे बॉय अजय देवगण (Ajay Devgn) याने आज त्याच्या चाहत्यांना आगामी सिनेमा RRR मधील त्याच्या लूकची झलक रिटर्न गिफ्ट म्हणून दिली आहे. दरम्यान बॉलिवूड सिनेमांमध्ये अधिराज्य गाजवल्यानंतर आता अजय तेलगू सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR या सिनेमामधून तो पहिल्यांदा तेलगू सिनेमामध्ये दिसणार आहे. आज अजयने सोशल मीडीयामध्ये त्याच्या या आगामी सिनेमामधील दमदार लूक शेअर केला आहे. RRR Movie Teaser: एस.एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; पहा ज्युनियर एनटीआरचा जबरदस्त लूक.

RRR या सिनेमामध्ये अजय सोबत अभिनेत्री आलिया भट्ट देखील असणार आहे. आलिया भटचा फर्स्ट लूकही तिच्या वाढदिवसाला म्हणजे 15 मार्च रोजी रिलीज करण्यात आला होता. आलिया या सिनेमामध्ये सीताची भूमिका साकारणार आहे.

अजय देवगणचं ट्वीट

दरम्यान RRR या सिनेमामध्ये आलिया भट, अजय देवगण, राम चरण, ज्यूनिअर एनटीआर, समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसर डूडी आणि रे स्टीवनसन हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘RRR’ हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.