RRR Movie Teaser: एस.एस. राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; पहा ज्युनियर एनटीआरचा जबरदस्त लूक
RRR Movie Teaser (PC - YouTube)

RRR Movie Teaser: बाहुबली दिग्दर्शक एस.एस. राजामौलीच्या (Director SS Rajamouli) बहुभाषिक चित्रपट आरआरआर (RRR) मध्ये ज्युनियर एनटीआरच्या व्यक्तिरेखेचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. यात एनटीआरने भीमा (Bheem) हे पात्र साकारलं आहे. या चित्रपटाचा टीझरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. RRR चा टीझर अतिशय जबरदस्त असून सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीझरमधील सीन्सद्वारे भीमाच्या चारित्र्याचे अमर्याद सामर्थ्य आणि इच्छाशक्ती दर्शविली गेली आहे. यात भीम जंगलातील विचित्र परिस्थितीत पळताना दाखवण्यात आला आहे. त्याच्याकडे समुद्र थांबविण्याची क्षमता असल्याचे सांगितलं जात आहे. एस.एस. राजामौली यांनी दृश्यांना शूट करण्यासाठी ज्याप्रकारे कॅमेरा अँगल वापरला आहे. त्यानुसार, संपूर्ण चित्रपटात जबरदस्त सीन असणार याची प्रचिती येत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना आलियाने म्हटलं आहे की, भीमबद्दल सांगण्यापेक्षा आपल्या रामराजूपेक्षा श्रेष्ठ कोण असू शकेल? भीमला भेटा.' या चित्रपटात आलिया भट महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. याशिवाय अजय देवगनदेखील एका खास भूमिकेत दिसणार आहे. (हेही वाचा - Mirzapur 2 ला पायरसीचे ग्रहण? सुपरहिट वेबसिरीजचे सर्व एपिसोड्स Telegram आणि TamilRockers वर लीक)

आरआरआर चित्रपटाचे पूर्ण नाव रुद्रराम रणम रुधिराम (Roudram Ranam Rudhiram) असं आहे. ज्यात ज्यूनिअर एनटीआरच्या पात्राचे पूर्ण नाव कोमाराम भीमा आहे. कोमाराम भीमा हा एक स्वातंत्र्यसैनिक होता. त्याने तरुणपणीचं गाव सोडले होते. मात्र, जेव्हा तो परत आला, तेव्हा तेथे सुशिक्षित लोक होते. त्यांने आदिवासींसाठी निजामाच्या राजवटीविरूद्ध युद्ध केले होते. त्यांनी गनिमी युद्धाची शैली अवलंबिली आणि नंतर ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देऊन शहीद झाले.

याशिवाय दिग्दर्शक राजामौली यांनी या चित्रपटाचे टीझर शेअर करताना म्हटलं आहे की, आपल्या स्वतःच्या रामराजापेक्षा भीमची शक्ती कोण अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकेल. भीमा तुमच्या सर्वांसाठी उपस्थित आहे.

रिपोर्टनुसार, टीझर ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवशी 20 मे रोजी येणार होता. दरम्या, राम चरनच्या वाढदिवशी त्यांची भूमिका असलेला 'अल्लुरी सीताराम राजू' चित्रपट इंट्रोड्यूस करण्यात आला होता. अलूरी सीताराम राजू चित्रपटाची कथादेखील भीमासारखीचं आहे. अलूरी सीताराम राजू देखील तेलगू प्रांताचे आदिवासी नेते होते. त्यांनी आपले गाव सोडले आणि नंतर ब्रिटीश राजवटीविरूद्धच्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला होता.