
Yamaha Fascino BS6 Price & Features: जापानी वाहन निर्माता कंपनी यामाहा (Yamaha ) भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षीत Fascino 125 ही दुचाकी लॉन्च केलीआहे. Fascino 125 स्कूटर BS6 इंजन सोबत अनेक बदल करत लॉन्च करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार या नव्या स्कूटरची किंमत 66,430 ते 69,930 रुपये इतकी सांगितली जात आहे. ऑटो क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणजने आसे की, कंपनीने Fascino 125 ची किंमत प्रतिस्पर्धी Honda Activa BS6 ला टक्कर देण्यासाठी मुद्दामच कमी ठेवली आहे. Fascino 125 मध्ये केवळ इंजिनच नव्हे तर, इतर फिचर्समध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. जे आगोदरच्या मॉडेलच्या तुलनेत बरेच अद्ययावत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सध्यातरी ही स्कूटर ग्लॉस रेड आणि मॅटे ब्लू रंगात उपलब्ध होणार आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने ब्लॅक एस्थेटिक अपील्सला अधिक प्रभावी बनविण्यासाठी व्हील्स, ग्रॅब रेल्स आणि इतर प्लास्टिक पॅनल्सचा वापर केला आहे. त्याशिवाय मध्ये क्रोमही अत्यंत खुबीने वापरला आहे.

Yamaha Fascino BS6 फिचर्स
इंजिन
Yamaha Fascino च्या आगोदरच्या BS4 मॉडलमध्ये वापरण्यात आलेल्या इंजिनबद्दल बोलायचे तर त्यात कंपनीने 113cc इतक्या क्षमतेचे एयरकूल्ड SOHC सिंगल सिलिंडर इंजिन वापरले होते. जे bhp ची पॉवर आणि 8.1Nm चा टॉर्क निर्माण करत असे. परंतू, Yamaha Fascino BS6 या नव्या मॉडेलबाबत बोलायचे तर हे मॉडेल आगोदरच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक पॉवरफुल आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही स्कूटर BS4 मॉडल तुलनेत 30% अधिक पॉवर निर्माण करते. या स्कूटरचे इंजिन 8.2 इतकी पॉवर आणि 9.7 Nm इतका टॉर्क निर्माण करते.
मायलेज
दरम्यान, कंपनीने दावा केला आहे की, Fascino BS6 ही मायलेजच्या बाबतीतही आगोदरच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आहे. ही स्कूटर आगोदरच्या मॉडेलच्या तुलनेत 16% अधिक मायलेज देते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर प्रतिलीटर 58 किलोमीटर इतके मायलेज देते. यात स्मार्ट मोटर जनरेटरचा तांत्रिक प्रयोगही करण्यात आला आहे. (हेही वाचा, MG Motor भारतात करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक; MG eZs इलेक्ट्रिक एसयूव्हीसह, बाजारात आणणार 4 नवीन मॉडेल्स)

किंमत
Fascino BS6 या गाडीच्या किमतीबद्दल बोलायचे तर आगोदरच्या BS4 मॉडलची सुरुवातीची किंमत साधारण 58,000 रुपये (एका एक्स शोरुमने दिलेल्या माहितीनुसार) होती. तर नव्या Fascino BS6 ची एण्ट्री लेवल स्टॅंडर्ड ड्रम व्हेरियंटची किंमत 66,430 रुपये (एका एक्स शोरुमने दिलेल्या माहितीनुसार) इतकी आहे. तर स्टँडर्ड डिस्क ब्रेक व्हेरिएंट ची किंमत 68,930 रुपये, डिलक्स ड्रम ब्रेक व्हेरिएंट ची किंमत 67,430 रुपये आणि डिलक्स डिस्क ब्रेक व्हेरिएंट की किंमत 69,930 रुपयांपर्यंत आहे. या सर्व किमती एका एक्स शोरुमने दिलेल्या माहितीनुसार आहेत.
Yamaha Fascino BS6 या गाडीची थेट टक्कर देशात सर्वाधिक विकल्या जाणारी स्कूटर Honda Activa 125, TVS Jupiter और Suzuki Access आणि Suzuki Access यांसारख्या स्कूटर्ससोबत होणार आहे. होंडा अॅक्टीव्हाच्या नव्या BS6 मॉडल ची किंमत एका एक्स शोरुमने दिलेल्या माहितीनुसार 67,490 रुपये ते 74,490 रुपयांपर्यंत आहे.