नवे वाहतूकीचे नियम लागू झाल्यानंतर रस्ते अपघातात घट झाल्याचे दिसून आले आहे. मात्र बहुतांश वेळी दुचाकी जाणाऱ्यांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. यामुळे सरकारकडून अशा अपघातांवर आळा घालण्यासाठी नवे नियम राज्यात लागू करण्यात आले आहेत. पण काही लोक हे नवे नियम ढाब्यावर ठेवून गाडी सुस्साट चालवतात. गाडी चालवताना हेल्मेट घालणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले जाते.
काही जण हेमेल्ट खरेदी करताना खुप घाई करतात किंवा एखाद्या वेळेस आपल्या डोक्याच्या साईज प्रमाणे आहे की नाही याचा विचार करत नाही. फक्त फॅशनेबल हेल्मेट दिसले की ते विकत घेणे ही बाब चुकीची आहे. त्यामुळे हेल्मेट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. हेल्मेट खरेदी करताना नेहमी ISI मार्क असलेले खरेदी करावे. म्हणजेच अशा पद्धतीचे हेल्मेट हे सर्वात सुरक्षित असल्याचे मानले जाते. भारतीय बाजारात Steelbird, Studds, Vegaआणि Mavox सारख्या ब्रॅन्डचे खिशाला परवडतील अशा किंमतीत हेल्मेट उपलब्ध आहेत.(पेट्रोलशिवाय चक्क 300 किलोमीटर धावणारी Tata Nexon इलेक्ट्रिक SUV कार लवकरच होणार लॉन्च)
तसेच हेल्मेट खरेदी करताना नेहमीच साइज आणि शेप बघून घ्यावे. कारण हेल्मेट डोक्यात घातल्यानंतर ते मोठे आणि सैल वाटत असल्यास कोणत्याही दुर्घटनेवेळी पडल्यास ते सहज डोक्यातून निघू शकते. तसेच हेल्मेट अगदीच डोक्याला घट्ट होईल असे घेऊ नका. एवढेच नाही तर हेल्मेट वजनाने अधिक जड नसावे. कारण लांबच्या प्रवासादरम्यान हेल्मेट सातत्याने डोक्यात असल्याने त्याचा परिणाम मानेवर सुद्धा होऊ शकतो. हेल्मेटचे वजन नेहमीच 1200 ते 1350 ग्रॅम दरम्यान असावे. हेल्मेटमध्ये इनर पॅडिंगसोबत ब्रीथ गार्ड आणि चिन कर्टन फिचर सुद्धा असणे अत्यावश्यक आहे.