नवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट
Cars | Image used for representational purpose (Photo Credits: PTI)

भारतात अशा काही दमदार कार बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्यावर एप्रिल महिन्यात बंपर डिस्काउंट दिला जात आहे. या कारमध्ये Maruti Suzuki Alto, Renault Kwid आणि Datsun Redi-Go यांचा समावेश आहे. या कारवर सध्या दमदार ऑफर दिली जात असून तुम्ही जर नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्याकडे उत्तम संधी आहे. अशाच काही कार बद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार असून त्याच्या किंमतीसह फिचर्स पर्यंतच्या सर्व गोष्टी तुम्हाला येथे कळणार आहेत.(देशातील 'या' सर्वाधिक स्वस्त CNG कार तुम्हाला माहिती आहेत का? ग्राहकांना मिळणार जबरदस्त मायलेज)

एप्रिल महिन्यात Datsun ची Redi Go कार खरेदी करत असाल तर तुम्हाला एकूण 37 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीकडून यावर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना यावर 7 हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट ही मिळणार आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 3,83,800 रुपये आहे. तर टॉप अॅन्ड वेरियंटची किंमत 4,95,600 रुपये आहे.

Renualt Kwid तुम्ही एप्रिल महिन्यात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तब्बल 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. कारण कंपनीकडून यामध्ये 10 हजार रुपयांचा कॅश बॅक डिस्काउंट आणि 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना 10 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट ही मिळणार आहे. याची भारतीय बाजारात किंमत 3,18,100 रुपये आहे. तसेच याच्या टॉप अॅन्ड वेरियंटची किंमत 5,39,000 रुपये आहे.(Google Maps मध्ये कंपनी जोडणार नवे फिचर, आता चालकांना मिळणार इको फ्रेंडली मार्गाचा पर्याय)

त्याचसोबत Maruti Suzuki ची Alto तुम्ही या महिन्यात खरेदी केल्यास तुम्हाला एकूण 36 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीकडून यावर 17 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 15 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जाणार आहे. याची भारतात सुरुवाती किंमत 2,99,800 रुपये आहे. तर याच्या टॉप अॅन्ड वेरियंट तुम्हाला 4,48,200 रुपयांत खरेदी करता येणार आहे.