देशातील 'या' सर्वाधिक स्वस्त CNG कार तुम्हाला माहिती आहेत का? ग्राहकांना मिळणार जबरदस्त मायलेज
Maruti Suzuki Wagon R CNG (Photo Credits- Facebook)

भारतासह संपूर्ण जगात ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे भविष्य आता पारंपरिक इंधन म्हणजेच पेट्रोल इंजिन पेक्षा हटके असणार हे नक्की. कारण काही देशातील सरकारकडून राष्ट्रीय स्तरावर काम केले जात असून अन्य इंधनाच्या ऑप्शनबद्दल सुद्धा वेगाने विस्तार करत आहेत. जगभरात विविध इंधनाबद्दल काम अद्याप ट्रायल फेजमध्ये आहे. ज्यामध्ये हायड्रोजन, सोलर उर्जा यांचा समावेश आहे. तर भारताबद्दल बोलायचे झाल्यास सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची एन्ट्री झाली आहे. यापूर्वी सीएनजी गॅसवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा उपलब्ध आहेत. तर जाणून घ्या देशातील सर्वाधिक स्वस्त CNG कारबद्दल अधिक माहिती. त्याचसोबत या कार किती मायलेज देऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला येथे कळणार आहे.

भारतात सध्या इलेक्ट्रिक कार पर्याप्त स्वरुपात उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. अशातच पेट्रोल-डिझेलमुक्त बजेटच्या लिस्ट मध्ये Hyundai Santro अशी एक कार आहे जी तुम्ही खरेदी करु शकता. कंपनी फिटेड CNG कार 5.86 लाख रुपये एक्स शोरुम किंमतीत खरेदी करु शकता. यामध्ये 1086 सीसीचे 4 सिलेंडर इंजिन दिले गेले आहे. ही कार 68.7 बीएचपी आणि 99.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ARAI नुसार ही कार20.3Km/kg चा मायलेज देण्यास सक्षम आहे.(ट्रायम्फने भारतात लॉन्च केली Bonneville ची नवी रेंज, किंमतीसह फिचर्मध्ये करण्यात आले बदल)

मारुती सुजुकीची हा सर्वाधिक स्वस्ती हॅचबॅक कार अल्टोचे नाव सुद्धा यामध्ये आहे. कंपनीने 800cc च्या क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे. जो 40hp ची पॉवर आणि 60Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सह येणार आहे. ऐवढेच नाबी तर अल्टोचे सीएनजी वेरियंट हे एखाद्या बाईक प्रमाणेच 32 किमीची जबरदस्त मायलेज देणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, सीएनजीवर अल्टो 31.59 चे मायलेज देणार आहे. याची फ्युल कॅपिसिटी 60 लीटरची असून या दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही 4.37 लाख रुपये एक्स शोरुमची किंमतीवर ती खरेदी करु शकता. (सिंगल चार्जमध्ये 375 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम ठरतील भारतातील 'या' इलेक्ट्रिक कार)

स्वस्त आणि कमी मेंटनेन्स असणाऱ्या कारमध्ये Wagnor R चा जरुर समावेश केला जातो. कंपनीकडून येणारी ही CNG  फिटेड कार मध्यमवर्गीय परिवारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. याची एक्स शोरुम किंमत 5.45 लाख रुपये आहे. वॅगन आर सीएनजी तुम्हाला जवळजवळ 32 किमी पर्यंतचे मायलेज देणार आहे. याचे सीएनजी वेरियंट 998 सीसीचे 4 सिलिंडेर असणारे आहे. जो 81 बीएचपीवर 113 एनएम पर्यंतचा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या व्यतिरिक्त कमी रेंजमध्ये जर मारुतीची सीएनची कार तुम्हाला खरेदी करायची असल्यास तुमच्याकडे मारुती अल्टो हा उत्तम ऑप्शन आहे.