Triumph New Bonneville Range Launched: ब्रिटिशची प्रसिद्ध मोटरसायकल निर्माता कंपनी ट्रायम्फने यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 2021 मध्ये बोनविले रेंजचा खुलासा केला होता. त्यानंतर आता कंपनीने भारतात 2021 Bonneville रेंज लॉन्च केली आहे. अत्यंत आकर्षक लूक आणि दमदार इंजिन लैस नवी ट्रायम्फ स्ट्रिट द्विनची किंमत 7.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर 2021 बोनविले T100 ची किंमत 9.29 लाख रुपये आहे. यासह नव्या बोनेविले T120 आणि T120 ब्लॅक 10.65 लाखांमध्ये उतरवण्यात आली आहे. तर बोनविले स्पीडमास्टरसाठी तुम्हाला 11.75 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. माहितीसाठी, यंदा ट्रायम्फने सुद्धा स्ट्रिट द्विन गोल्ड लाइन लिमिटेड अॅडिशन 8.25 लाख मध्ये उपलब्ध दिली गेली आहे.
2021 ट्रायम्फ बोनविले स्ट्रिट द्विन कास्ट व्हिल्ससह मशीन टॉक डिटेलिंग, नवे साइट पॅनल आणि बॉडी डिकल्ससह ब्रश अॅल्युमिनियम हेडलॅम्प ब्रॅकेट आणि नवी थ्रोटेट बॉडी फिनिशर्स सारखे कॉस्मेटिक द्विक्स मिळणार आहे. तर स्ट्रिट द्विन गोल्ड लाइन लिमिटेड अॅडिशन मॅट निलम ब्लॅक पेंट योजनेत ट्रायम्फ लोगो दिला गेला आहे.(Bitcoin Cryptocurrency च्या माध्मयातून आता टेस्लाच्या गाड्या विकत घेता येणार, Elon Musk यांची घोषणा)
दोन्ही बाईक्स एक अपटेडेट 900 सीसी लिक्विड कूल्ड पॅरेलल द्विन हाय टॉर्क इंजिन दिले गेले आहे. याआधीसारखेच 64 बीएचपीची पॉवर आणि 80 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. या बाइक्समध्ये दोन रायडिंग मोड्स, ABS, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, Brembo फ्रंट ब्रेक दिला गेला आहे.(Driving License संदर्भातील 'या' नियमात मोठा बदल; आता रविवारीही करू शकता 'हे' काम, वाचा सविस्तर)
नवी ट्रायंफ बोनविले T100 आधीच्या तुलनेत अधिक पॉवरफुल इंजिन दिले गेले आहे. ज्यामध्ये पहिले मॉडेल 54 बीएचपीची पॉवर आणि 80 एनएम टॉर्क जनरेट करणार आहे. या व्यतिरिक्त बाइकच्या डिझाइनमध्ये कोणतेही अन्य बदल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान कंपनीने काळ्या पाउडर कोटेड फिनिशिंग इंजिन कव्हर आणि कॅम कव्हर जोडले आहे. 2021 T110 स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, ABS आणि एक अंडर सीट पोर्टसह येणार आहे.