Saeed Rashed AlMheiri अवघ्या 4 वर्षांच्या मुलाच्या नावावर Youngest Person to Publish a book (male)चा Guinness World Records नोंदवण्यात आला आहे. सईदला वाचन, लेखन आणि कथा सांगण्याची आवड आहे. त्याच्या या आवडीमधूनच त्याने हा विश्वविक्रम करण्याची किमया साधली आहे. त्याला त्याच्या वयातील इतर मुलांना यामधून प्रेरणा द्यायची आहे. तसेच वयाची पर्वा न करता अस्तित्वात असलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा त्याचा मानस आहे. सईद हा मूळचा युएई च्या अबुधाबी मधील आहे. 4 वर्ष 218 दिवसांच्या सईदच्या पुस्तकाच्या 1000 कॉपीज विकल्या गेल्या आहेत.
'The Elephant Saeed and the Bear' असं सईदच्या पुस्तकाचं नाव आहे. दोन प्राण्यांमधील दयाळूपणा आणि अनपेक्षित मैत्रीची यावर सईदच्या पुस्तकाची कथा बांधण्यात आली आहे. 9 मार्च 2023 दिवशी त्याच्या पुस्तकाचा रेकोर्ड नोंदवण्यात आला आहे. त्याच्या पुस्तकाच्या 1000 प्रति विकल्या गेल्या आहेत.
पहा ट्वीट
New record: Youngest person to publish a book (male) - Saeed Rashed AlMheiri (UAE) at 4 years, 218 days old
The book has sold over 1,000 copies 🥰️https://t.co/nliHHZgjlh
— Guinness World Records (@GWR) March 30, 2023
सईद कुटुंबातील एकमेव विश्वविक्रम रचणारा व्यक्ती नाही. त्याला त्याचे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्याची मोठी बहीण अलधाबी AlDhabi हिने दिली होती. AlDhabi च्या नावावर द्विभाषिक पुस्तक (स्त्री) प्रकाशित करण्यासाठी जगातील सर्वात तरुण व्यक्तीचा विक्रम आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीतच तिने वयाच्या 8 व्या वर्षी द्विभाषिक पुस्तक मालिका (महिला) प्रकाशित करण्याचा सर्वात तरुण व्यक्तीचा विक्रम मोडला आहे. नक्की वाचा: Afshin Esmaeil Ghaderzadeh: क्रिकेट बॅट पेक्षा कमी उंचीचा, जगातील सर्वात बुटका माणूस, उंची फक्त 2.6 इंच, नाव-अफशीन इस्माइल घदरजादेह; घ्या जाणून .
AlDhabi ने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे मुलांपासून मुलांपर्यंत पुस्तकं. या उपक्रमाचा उद्देश आहे की 4-10 वर्षे वयोगटातील मुलांना अरबी किंवा इंग्रजीमध्ये लिहिण्यास प्रोत्साहित करणे आहे, जेणेकरून लेखक, चित्रकार, प्रकाशक आणि पुस्तक वाचणारे सर्व मुलेच असणार आहेत.