World’s Shortest Man Video: जागतील सर्वात कमी उंचीचा माणूस (World’s Shortest Man) म्हणून असलेले सर्व विक्रम इराणमधील 20 वर्षीय अफशीन इस्माइल घदरजादेह (Afshin Esmaeil Ghaderzadeh) या व्यक्तीने मोडीत काढले आहेत. होय, आता जगातील सर्वात बुटका व्यक्ती अफशिन इस्माईल गदेरजादेह याचे नाव घेतले जाते. त्याच्या या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही (Guinness World Records) नोंद घेतली आहे. अफशिन इस्माईल गदेरजादेह हा केवळ 65.24 सेमी (2 फूट 1.6 इंच) उंचीचा आहे. म्हणजेच क्रिकेटची बॅटही त्याच्यापेक्षा उंच असल्याचे सांगितले जाते.
जगातीस सर्वात कमी उंचीचा व्यक्ती म्हणून असलेला विक्रम कोलंबियाच्या 36 वर्षीय एडवर्ड 'निनो' हर्नांडेझ याच्या नावावर होता. निनो याची उंची 70.21 सेमी मोजली गेली होती साधारण 7 सेंटीमीटरने आगोदरच्या व्यक्तीचा विक्रम मोडीत काढत त्याने हा विक्रम स्थापन केला. तो इरानच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील बुकान काउंटी परिसरात राहतो. त्याचा जन्म 13 जुलै 2002 रोजी झाला.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अफशीनने आपल्या आई-वडिलांसह इराणहून पहिल्यांदाच आपले घर सोडले आणि त्याने दुबईतील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या कार्यालयात रेकॉर्डची पडताळणी केली. या कार्यालयात अफशीनचे 24 तासात तीन वेळा मोजबाम घेण्यात आले. त्यानंतर त्याला जगातील सर्वात लहान व्यक्ती म्हणून घोषीत केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने अफशीनचा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. तो आपण येथे पाहू शकता. (हेही वाचा, World's Oldest Person Dies: जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Kane Tanaka यांचे जपानमध्ये निधन; वयाच्या 119 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
व्हिडिओ
दरम्यान, यूट्यूबवर अनेक युजर्सनी व्हिडिओवर प्रतिक्रिया देत वर्ल्ड रेकॉर्डबद्दल आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले, "अभिनंदन, त्याला निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा," तर दुसर्याने टिप्पणी केली, "असे दिसते की तो एक खूप उदार आणि दयाळू व्यक्तिमत्व आहे."
दुबईत असताना अफशीनने दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीलाही भेट दिली. नवीन विश्वविक्रम साजरा करण्यासाठी, अफशिनने दुबईतील एका सलूनला भेट दिली. त्याने तिथे त्वरीत दाढी आणि ट्रिम केली. तसेच, एका शिंप्याला गाटून त्याचा सूट बदलून घेतला. शिंप्याने त्याचा थ्री-पीस सूट 2-3 वर्षांच्या मुलासाठी बनवला आहे.