Pilot Delivers a Baby Mid-Air: तैवानमधील तैपेई ते थायलंडमधील बँकॉक (Bangkok) या प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेला विमानात बाळंतकळा झाल्या आणि तिची विमानातच प्रसूती झाली. ही घटना व्हिएटजेट विमानात घडली. ही घटना इतकी आणीबाणीची होती की, विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्याइतकाही पुरेसा वेळ नव्हता. या वेळी विमानातील एक पायलट एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा पुढे आला. त्याने आपल्या वैद्यकीय शिक्षणातील कसब पणाला लावत महिलेची प्रसूती करण्यास मदत केली. पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतुक होऊ लागले आहे.
महिलेला विमानातच बाळंतकळा
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, विमानातील केबिन क्रूने पायलट जकरिन सरर्नरस्कुल याला माहिती दिली की, विमानाच्या बाथरुममध्ये एका महिलेला बाळंतकळा सुरु झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी तिची प्रसूती होऊ शकते. माहिती मिळताच पायलटने लगेचच बाथरुमकडे धाव घेतली आणि वैद्यकीय कसब पणाला लावत महिलेची प्रसूती अगदी सामान्य होईल यासाठी प्रयत्न केले. पायलट 18 वर्षांपासून सेवेत आहे आणि त्याला एक बाळही असल्याचे समजते. (हेही वाचा, Sex on Plane: EasyJet flight मध्ये जोडपं टॉयलेट मध्ये सेक्स करताना आढळलं; प्रवाशांनी शेअर केला व्हिडिओ (Watch Video))
पायलटने कथन केला अनुभव
पायलट सरर्नरकसुल याने इन्स्टाग्रामवर आपला अनुभव शेअर करत घडल्या प्रसंगाबद्दल सांगितले. त्याने विमानात जन्माला आलेल्या बाळाला 'स्काय बेबी' असे नाव दिले. विमाननात त्याच्या हातून घडलेल्या मदतीबद्दल अभिमान व्यक्त केला. त्याने म्हटले आहे की, पायलट म्हणून मला 18 वर्षांचा अनुभव आहे. माझ्या एकूण कारकीर्दीमध्ये मी अनेक प्रसंग पाहिले, अनुभव घेतले पण हा अनुभव निराळा होता. व्हायरल प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सारर्नरक्सुलने उड्डाणाच्या मध्यभागी बाळाला जन्म देण्याची ही पहिलीच वेळ होती. (हेही वाचा, Woman Harassed In INDIGO Flight: इंडीगो फ्लाईटमध्ये महिलेचा लैंगिक छळ, मुंबई-गुवाहाटी विमान प्रवासादरम्यान विनयभंगाच्या घटनेची पुनरावृत्ती .)
इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
दुर्मिळ घटना
दरम्यान, विमान बँकॉकमध्ये उतरण्यापूर्वीच आई आणि तिच्या नवजात बाळासाठी वैद्यकीय पथक तैनात होते. डॉक्टरांनी दोघेही सुरक्षित आणि निरोगी असल्याची पुष्टी केली. विमान हवेत असताना बाळाचा जन्म होणे ही अतिशय दुर्मिळ घटना मानली जात आहे. तसेच, अशा प्रकारे प्रसूती होण्याबाबत कौतुक आणि उत्सुकताही व्यक्त केली जात आहे. हा अनुभव कथन करणाऱ्या सारनरकसुलच्या Instagram पोस्टने जगभरातील नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे आणि तो कौतुकासही पात्र ठरला आहे. त्याच्या पोस्टखाली अनेकांनी त्याचे तोंडभरुन कौतुक करणाऱ्या पोस्ट लिहील्या आहेत.
स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही हवाई उड्डाण इतिहासातील एक दुर्मिळ परंतु उल्लेखनीय घटना आहे, ज्यामध्ये 1929 ते 2018 दरम्यान व्यावसायिक उड्डाणांमध्ये बालकांचा जन्म झाल्याची 74 घटना पुढे आल्या आहेत. सारर्नरकसुलच्या उल्लेखनीय पराक्रमामुळे या संख्ये आणखी भर पडली आहे.