Snake in Plane: विमान 11 हजार फूट उंचीवर असताना पायलटला दिसला कोब्रा; पुढे काय झालं? तुम्हीचं वाचा
Flight, Snake (PC- Pixabay)

Snake in Plane: दक्षिण आफ्रिकेकडे जाणारे विमान हवेत 11,000 फूट उंचीवर असताना पायलटला या विमानात अत्यंत विषारी कोब्रा दिसला. त्यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाण तज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील पायलट रुडॉल्फचं कौतुक केलं आहे. हा कोब्रा पायलटच्या सीटमागे बसला होता. एका अहवालानुसार, पायलट सोमवारी सकाळी चार प्रवाशांसह एक छोटे विमान वॉर्सेस्टर ते नेल्स्प्रूट उडवत होता. टाइमलाइव्ह या वेबसाईटशी बोलताना रुडॉल्फ आपला अनुभव सांगितला.

या विमानाचा पायलट रुडॉल्फने सांगितले की, आधी मला थंडगार स्पर्श जाणवला. त्यामुळे पहिल्यांदा मला वाटलं की, पाण्याच्या बाटतीतून पाणी सांडलं असावं. मात्र, नंतर मी मागे पाहिलं तर मला माझ्या पाठीमागे सीटखाली क्रोबा दिसला. मी प्रवाशांना याची कल्पना दिली नाही. कारण, विमानात साप असल्याचं त्यांना समजलं असतं तर, सर्व प्रवासी घाबरून गेले असते आणि विमानात गोंधळ उडाला असता. (हेही वाचा - अमेरिकेत 63 वर्षीय व्यक्ती AI Chatbot च्या प्रेमात पडून झाली विवाहबद्ध; अजब 'डिजिटल लव्ह स्टोरी')

दरम्यान, रुडोल्फ यांनी न घाबरता विमानाचं आपत्कालीन लॅण्डींग करण्याचा निर्णय घेतला. रुडॉल्फ यांनी यशस्वीपणे विमान उतरवलं. हा साप विमान आला कसा? असा प्रश्न सर्वांनाचं पडला आहे, विशेष म्हणजे विमानाचे आपत्कालीन लँडींग केल्यानंतर सर्व प्रवासी बाहेर आले. मात्र, यावेळी साप सापडला नाही. साप नेमकी कोठे गेला? असा प्रश्न या पायलटला पडला आहे.

साप शोधण्याच्या प्रयत्नात अभियंत्यांनी विमानाचे काही भाग काढून टाकले. परंतु, रात्री उशिरापर्यंत ते अयशस्वी झाले. एव्हिएशन स्पेशलिस्ट आणि एसए चीफ एअर शो समालोचक ब्रायन एममेनिस यांनी सांगितलं की, इरास्मस विमान उड्डाणातील सर्वात मोठे कौशल्य प्रदर्शित केले आहे. एमेनिस म्हणाले की त्यांनी हवाई वाहतूक उद्योगातील चार दशकांमध्ये असे प्रकरण कधीच ऐकले नव्हते. जर कोब्राने पायलटला चावा घेतला असता तर त्याचा मृत्यू झाला असता. तो एक परिपूर्ण नायक आहे. तो घाबरू शकला असता. परंतु, त्याने अत्यंत संयमाने विमानाचे लँडींग केले.