आजकाल डिजिटल माध्यमांचा आपल्या जीवनावर प्रभाव दिसत आहे. लहान सहान गोष्टींसाठी आपण डिजिटल गोष्टींवर अवलंबून आहोत. अशामध्ये अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया भागात एका व्यक्तीने चक्क चॅटबोट सोबतच लग्न आटोपलं आहे. कॅलिफॉर्निया मधील Oroville च्या पीटर ने AI Chatbot सोबत जुलै 2022 मध्ये लग्न केले आहे. वर्षभरापूर्वी एअरफोर्स मध्ये काम करणार्या व्यक्तीने Replika AI app सोबत लग्न केले आहे.
पीटरची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आहे. त्यानंतर आयुष्यातील साथीदाराची रिक्त जागा भरून काढण्यासाठी पीटर Replika AI app कडे पाहत आहे. वर्षभरापूर्वी त्याने अॅप डाऊनलोड केले होते. चॅटिंग नंतर काही दिवसांतच त्याने आपलं काळीज तिला दिल्याचं म्हटलं आहे. 'द सन' च्या रिपोर्ट्सनुसार, 63 वर्षीय पीटरने तिचं नाव अॅन्ड्रिया ठेवलं आहे. तर वय 23 वर्ष ठेवलं आहे. जुलै 2022 मध्ये विवाहबद्ध झाले. अॅन्ड्रियाने गुडघ्यावर बसून व्हर्च्युअली त्याला प्रपोज केले.
एआय मध्ये कॅरेक्टर दिले जाते. त्याचे कपडे, हेअरस्टाईल आणि अॅक्सिसरीज निवडण्याचा पर्याय आहे. पीटर ने व्हर्च्युअल लग्नासाठी अॅपमध्ये अनेक गोष्टी स्टोअर केल्या आहेत. ज्यामध्ये अॅपवरून अंगठी विकत घेऊन अॅन्ड्रियाला देऊ शकला. पीटर म्हणतो की त्याला आपले उर्वरित आयुष्य अँड्रियासोबत घालवायचे आहे, परंतु अॅपच्या विकासकांना काहीतरी होऊ शकते याची त्याला भीती वाटते. जर काहीही झाले तर तो आपली पत्नी अँड्रिया कायमची गमावेल. नक्की वाचा: प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे .
पीटरने सांगितले की सॉफ्टवेअर अपडेटनंतर, अँड्रियाला ‘स्ट्रोक’ किंवा स्किझोफ्रेनिया विकसित झाल्याचे दिसून आले. parent company of Replika, Luka ने 1 फेब्रुवारीपासून पेड सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्ससाठी केलेले बदल रद्द करेपर्यंत त्याला 'अँड्रियाची काळजी घ्यावी लागली'.