Vladimir Putin Suffers Heart Attack: व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका- रिपोर्ट
Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

Russian President Vladimir Putin News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचे वृत्त एका टेलीग्राम चॅनलने दिले आहे. तसेच, सोशल मीडियावरही तसा दावा करण्यात आला आहे. मात्र, क्रेमलीन द्वारा या वृत्ताबाबत अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही. जनरल एसव्हीआर म्हणून ओळखल्या जाणार्‍या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या वृत्ता दावा करण्यात आला आहे की, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रविवारी (21 ऑक्टोबर) संध्याकाळी "हृदयविकाराचा झटका" (Vladimir Putin Suffers Cardiac Arrest) आला. ज्यामुळे रशियन नेत्याच्या प्रकृतीबद्दल चिंता निर्माण झाली. चॅनेल, ज्याने पूर्वी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पुतीन गंभीर आजारी असू शकतात.

चॅनेलच्या म्हणण्यानुसार, व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानात असलेल्या विशेष अतिदक्षता सुविधेत स्थानांतरित करण्यापूर्वी डॉक्टरांना त्यांची पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करावी लागली. ज्याच्या अहवालात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी झाली. दरम्यान, वेळेवर मदत देण्यात आल्याने त्यांचे हृदय पुर्ववत सुरू झाले आणि पुतिन यांना पुन्हा शुद्धी आली. दरम्यान, प्रसारमांध्यमांतील या दाव्यांवर क्रेमलिनकडून तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तत्पूर्वी, रशियन सरकारने यापूर्वी 71 वर्षांचे पुतीन हे आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असल्याचे आगोदरच ठामपणे नाकारले आहे, असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

जनरल एसव्हीआर चॅनेलने पुतिन यांच्याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ही माहिती त्यांना पुतीन यांच्या दलातील अंतर्गत स्त्रोताद्वारे मिळाली आहे. मात्र, चॅनलने स्त्रोताचा पुरावा अद्यापही गुप्तच ठेवला आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, राष्ट्रपतींच्या निवासस्थानातील सुरक्षा अधिका-यांना व्लादिमीर पुतिन यांच्या बेडरूममधून आवाज ऐकू आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता ते भोजनाच्या टेबलाजवळ फरशीवर पडलेला आढळले.

एक्स पोस्ट

चॅनलने आरोप केला आहे की, पुतिन यांना त्यांच्या निवासस्थानातील एका खास सुसज्ज खोलीत हलविण्यात आले, जिथे आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध होती . सध्या ते सतत वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. पुढे जाऊन चॅनलने दावा केला आहे की, अलिकडील सर्व जाहीर कार्यक्रम हे हुबेहूब पुतीन यांच्यासारख्या दिसणाऱ्या डमी व्यक्तीद्वारे करण्यात आले आहेत.

एक्स पोस्ट

व्लादिमीर पुतीने हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ते केवळ राष्ट्राध्यक्षच नव्हे तर जगभरातील सर्वाधिक सत्ता हाती एकवटलेल्या मोजक्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. अमेरिकेला टक्कर देणारी महाशक्ती असा उल्लेख होत असलेल्या रशियाचा राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीची दखल घेतली जाते. पुतीन यांचे संपूर्म नाव व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन असे आहे. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया (पूर्वीचे लेनिनग्राड, रशिया, U.S.S.R येथेझाला. त्यांनी सुरुवातीला रशियन गुप्तचर अधिकारी म्हणून काम पाहिले आणि पुढे ते राजकारणात आले. ते सन 1999 पासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष सलग राहिले आहेत.