रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या प्रकृतीबाबत नवीन अहवालांमध्ये धक्कादायक दावा करण्यात आला आहे. पुतिन नियमितपणे हरणांच्या शिंगांपासून काढलेल्या 'रक्ताने' आंघोळ करतात, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे शारीरिक ताकद वाढते. तसेच ते थायरॉईड कर्करोग तज्ञ डॉक्टरांच्या ‘सतत’ संपर्कात असतात, असेही यामध्ये म्हटले आहे. पुतीन कुठेही गेले तरी कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर नेहमीच त्यांच्यासोबत असतात.
रशियाचे विद्यमान संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी पुतीन यांच्या या विचित्र उपचाराबद्दल सांगितले होते. पुतिन यांनी 2000 च्या दशकाच्या मध्यात हरणांच्या शिंगांपासून काढलेल्या सुगंधी अर्काने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळ केल्याचेही सांगितले जात आहे. रशियन न्यूज साइट Proact च्या रिपोर्टनुसार, पुतिन 70 वर्षांचे होणार आहेत त्यामुळे ते त्यांच्या तब्येतीबद्दल चिंतेत असल्याचे दिसत आहे. म्हणूनच ते असे प्रयोग करत आहेत.
पुतिन यांच्याबद्दल सतत सांगितले जात आहे की, त्यांनी युक्रेनवर हल्ला अशा वेळी केला जेव्हा त्यांना गंभीर आरोग्य समस्या आहेत, ज्या त्यांनी रशियाच्या लोकांपासून लपवून ठेवल्या. अहवालात म्हटले आहे की, फक्त पुतिनच प्राण्यांच्या रक्ताने अंघोळ करत नाहीत, तर असे करणाऱ्यांमध्ये रशियातील अनेक बड्या उच्चभ्रू लोकांचा समावेश आहे.
सायबेरियन टाइम्सच्या वृत्तानुसार, असे मानले जाते की हरणाच्या शिंगांच्या रक्ताने आंघोळ करणे आणि ते पिणे ही रशियामधील एक प्राचीन परंपरा आहे, जी चीन आणि कोरियामध्ये देखील दिसून येते. बातम्यांनुसार, ही प्रक्रिया महिलांना तरुण ठेवण्यास आणि पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्यास मदत करते. रशियन कंपनीने दावा केला आहे की, लाल हरणांच्या शिंगांमधून काढलेले रक्त मजबूत टॉनिक म्हणून काम करते. त्यामुळे पुरुषांची क्षमता वाढते. शरीराची हाडे, स्नायू, दात, दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता मजबूत होते. याव्यतिरिक्त, ते न्यूमोनिया, दमा, सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस आणि मणक्याच्या समस्या बरे करते. (हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांचा नवा चित्रपट; स्वतः केले लेखन, संपादन, संगीत आणि दिग्दर्शन, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा समावेश)
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, पुतिन सोची येथील लोकप्रिय ब्लॅक सी रिसॉर्टला वारंवार भेटी देतात. येथे मॉस्कोमधील सेंट्रल क्लिनिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांची देखभाल केली जाते. डॉक्टरांच्या या टीममधील एक डॉक्टर कर्करोग विशेषज्ञ इव्हगेनी सेलिव्हानोव्ह आहेत. चार वर्षांपासून त्यांनी पुतिनसोबत 166 दिवसांपेक्षा जास्त वेळ घालवला आहे