प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या व्हिसा संबंधित नियमात बदल करण्यात आला आहे. तर अमेरिकेचा व्हिजा मिळणाऱ्या अर्जदारांना आता त्यांच्या 5 वर्षामधील सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती सादर करावी लागणार आहे. स्टेट डिपार्टमेंट रेगुलेशन्स यांचे असे म्हणणे आहे की, अर्ज करणाऱ्या व्यक्तीने त्याचे सोशल मीडियावरील नाव आणि पाच वर्षापासून वापरण्यात येणाऱ्या ईमेल आयडीची माहिती देणे अनिवार्य आहे.

गेल्या वर्षी हा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेली अधिकाऱ्यांच्या मते जवळजवळ 14.7 मिलियन लोक यामुळे प्रभावित होतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र डिप्लोमॅटिक आणि अधिकृत व्हिजा अर्जकर्त्यांना नव्या नियमात सूट मिळणार आहे.

दरम्यान काम किंवा शिक्षणासाठी अमेरिकेत जायचा विचार करत असल्यास व्यक्तीला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, डिपार्टमेंट यांचे असे म्हणणे आहे की अमेरिकेत अधिकृत प्रवास करतेवेळी तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेतला जाणार आहे. यासाठी वारंवार सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.यापूर्वी प्रवास करणाऱ्या व्यक्तीला त्याने विदेशात दहशतवादी क्षेत्रांपासून मुक्त असलेल्या ठिकाणची कुठे कुठे प्रवास केला आहे त्याची माहिती द्यावी लागत होती.(अमेरिकेकडून भारताला व्यापारात 5 जून पासून कोणतीही सूट मिळणार नाही- डोनाल्ड ट्रम्प)

मात्र आता अर्जकर्त्यांना सोशल मीडिया प्लॅटफ्लॉर्मवर असणारी त्याच्या बद्दलची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच एखादा व्यक्ती सोशल मीडियाबद्दल खोटी माहिती देत असल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ट्रम्प सरकारने प्रथम मार्च 2018 मध्ये या नियमाचा प्रस्ताव मांडला होता.