अमेरिकेने (America) भारताला (India) जनरलाईज सिस्टिम ऑफ प्रेफरन्स (GSP) हा दर्जा देऊ केला होता. मात्र आता अमेरिकेकडून हा दर्जा काढून टाकण्यात येणार असल्याचा निर्णय अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या 5 जून पासून भारताला कोणत्याही व्यापारात सूट मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
तर भारताने अमेरिकेतील उत्पनादनांना भारतीय बाजारपेठेत संधी देण्याचे आश्वासन दिलेले नसल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी टर्की आणि भारताला देण्यात येणारा जीएसपी दर्जा काढून टाकणार असल्याचा इशारा दिला होता.या इशाऱ्याची ट्रम्प यांच्याकडून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचसोबत भारताने लावलेल्या विविध प्रतिबंधामुळे अमेरिकेचे नुसाकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.(उत्तर कोरिया: पाच राजदूतांना देहदंड; डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा अयशस्वी ठरल्याने हुकुमशाहा किम जोंग उन याने दिली शिक्षा)
दरम्यान भारतीय वाणिज्य सचिव अनूप वधावन यांनी असे म्हटले की, अमेरिकेने व्यापारावरील सूट बंद केली असल्यास अमेरिकेमधील 5.6 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही. तर अमेरिकी काँग्रेसच्या एका समितीने प्रशानसाला एक पत्र पाठवत भारताचा जीएसपीचा दर्जा काढून घ्यावा असे त्यामध्ये सांगण्यात आले होते.