Pilot | (Photo Credit - Twitter)

अमेरिकेतील एका पायलटने चक्क विमानच (US Pilot Stolen Aircraft) पळवले. तो केवळ विमान पळवूनच थांबला नाही तर त्याने हे विमान दुर्घटनाग्रस्त करण्याची धमकीही दिली. ही घटना घडली आहे मीसीसीपी (Mississipi) येथील वेस्ट मेनवर. विमानाच्या पायलटने विमान जाणीवपूर्वक अपघातग्रस्त करण्याची धमकी दिली. पोलिसांनी म्हटले आहे की, पायलटसोबत बोलणी सुरु आहेत. तो सातत्याने मिसिसिपीतील वॉलमार्टच्या Walmart) स्टोअरमध्ये विमान घुसविण्याची धमकी देत आहे. त्याच्याशी बोलणी सुरु असतानाच दुसऱ्या बाजूला वॉलमार्ट स्टोअरमधील दुकाने खाली केली जात असल्याची माहिती टुपेलो पोलिसांनी दिली.

टुपेलो पोलिसांनी पुढे सांगितले की, सर्व सेवा अपत्कालीन अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेत असेही म्हटले आहे की, नागरिकांना सांगण्यात आले आहे की वॉलमार्टपासून शक्य तितक्या दूर अंतरावर जावे. जोपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होत नाही तोवर नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे असेही पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Air India चे विमान धावपट्टीवरून घसरले; अपघात टळल्याने वाचले 55 प्रवाशांचे प्राण)

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

सांगितले जात आहे की, पायलटने एक छोटे विमान बीचक्राफ्ट किंग एअर 90 टुपेले विमानतळवारुन पळवले. गवर्नर टेट रीव्स यांनी म्हटले आहे की, हे विमान नऊ प्रवाशांना घेऊन जाणारे आहे. हे विमान डबल इंजिनचे आहे. राज्याचे कायदा आणि आपत्कालीन प्रतिबंध मंत्र्यांनी म्हटले आहे की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.