US President Donald Trump

US COVID-19 Vaccine: भारतासह संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना व्हायरसवरचे महासंकट अद्याप कायम आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत चालली आहे. त्यामुळे कोरोनाची लस जो पर्यंत बाजारात येत नाही तोपर्यंत अत्यंत धोकादायक अशा व्हायरस पासून सुटका झालेली नाही. याच दरम्यान, अमेरिकेत कोरोनावरील लसीचा पहिला डोस गेल्याची माहिती डोनाल्ड ट्रंम्प यांनी ट्विट करत दिली आहे.(Covid-19 Vaccine Update: Pfizer-BioNTech च्या लसीला अमेरिकेच्या FDA कडून आपात्कालीन वापरासाठी मंजूरी)

अमेरिकेत कोरोना व्हारसचा पहिला डोस दिला जाणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. डोनाल्ड ट्रंम्प यांना अमेरिकेला शुभेच्छा ही दिल्या आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, न्युयॉर्कमध्ये हेल्थ वर्करला फायझर कंपनी निर्मित कोरोनाच्या लसीचा पहिला डोस दिला गेला आहे.(Coronavirus Effects: कोरोना विषाणूमुळे संकटामध्ये भर; 2020 च्या मध्यापर्यंत जगभरातील तब्बल 8 कोटीपेक्षा जास्त लोकांचे सक्तीने स्थलांतर- UN)

Tweet:

दरम्यान, अमेरिकेची औषध कंपनी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक यांच्याकडून तयार करण्यात आलेली कोरोनाच्या लसीला ब्रिटेन, कॅनडा, बहरिन आणि सिंगापूर मध्ये हिरवा कंदील मिळाला आहे. तर अमेरिकेने फायझरच्या कोरोना व्हायरसच्या आपत्कालीन वापरसाठी परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 16 लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.